भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वांना प्रसाद दिल जाते. तुळशी विवाहाला गव्हाच्या पिठाचा शिरा नैवेद्य म्हणून बनवायला अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया गव्हाच्या पिठाच्या शिऱ्याचा प्रसाद कसा बनवायचा.
साहित्य
- ½ कप गव्हाचे पीठ
- ½ कप तूप
- ½ कप साखर
- अर्धी वाटी बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स
कृती
- एका भांड्यात तूप गरम करून त्यात गव्हाचे पीठ मंद आचेवर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
- जेव्हा पीठ सोनेरी होईल आणि सुगंध येऊ लागेल.
- पीठ चांगले भाजल्यानंतर त्यात पाणी घाला आणि गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या.
- नीट ढवळत असताना सर्व साहित्य मिक्स करा आणि त्यात ड्रायफ्रुट्स घाला.
- सतत ढवळत राहा, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.
- शेवटी वेलची पावडर घालून मिक्स करा.
- शिरा तयार झाल्यावर तुळशी विवाहात नैवेद्य म्हणून दाखवा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












