देवउठनी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेमधून जागे होतात. चातुर्मास संपताच शुभ कार्यांना सुरुवात होते. यावर्षी, देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल, ज्याला देवोत्थान एकादशी आणि देव प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. पौराणिक ग्रंथांनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी खूप महत्वाची आणि फलदायी मानली जाते. पूजा कशी करायची ते जाणून घेऊया…
देवउठनी एकादशी कधी साजरी केली जाईल?
देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर, शनिवारी सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 नोव्हेंबर, रविवारी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे, देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर, शनिवारी साजरी केली जाईल.

तुळशी विवाह कधी?
हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजून 31 मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरूवात होईल. तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 05 वाजून 07 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल.











