Dev Uthani Ekadashi 2025 : देवउठनी एकादशीला पूजा कशी करावी? जाणून घ्या…

Asavari Khedekar Burumbadkar

देवउठनी एकादशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला येते. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योग निद्रेमधून जागे होतात. चातुर्मास संपताच शुभ कार्यांना सुरुवात होते. यावर्षी, देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल, ज्याला देवोत्थान एकादशी आणि देव प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. पौराणिक ग्रंथांनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षात येणारी एकादशी खूप महत्वाची आणि फलदायी मानली जाते. पूजा कशी करायची ते जाणून घेऊया…

देवउठनी एकादशी कधी साजरी केली जाईल?

देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर, शनिवारी सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल आणि 2 नोव्हेंबर, रविवारी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांपर्यंत राहील. त्यामुळे, देवउठनी एकादशी 1 नोव्हेंबर, शनिवारी साजरी केली जाईल.

तुळशी विवाह कधी?

हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह केला जातो. यंदा 2 नोव्हेंबर रोजी सकाळी 07 वाजून 31 मिनिटांनी शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला सुरूवात होईल. तसेच ही तिथी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 05 वाजून 07 मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार, तुळशी विवाह 2 नोव्हेंबर 2025 रोजी साजरा केला जाईल.

पूजा कशी करायची?

  • देवउठणी एकादशीला पूजा करण्यासाठी, सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि देवाची पूजा करावी.
  • देवघरात भगवान विष्णू आणि लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून त्यांचे पूजन करावे.
  • तुळशीच्या रोपाचीही पूजा करून ११ दिवे लावावेत आणि ‘ओम नमो नारायणाय’ यासारख्या मंत्रांचा जप करावा.
  • उपवास धरावा आणि दुसऱ्या दिवशी द्वादशीला ब्राह्मणांना भोजन देऊन उपवास सोडावा. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या