Tulsi Vivah 2025 : नैवेद्यासाठी बनवा गाजराचा लाडू, वाचा सोपी रेसिपी

Asavari Khedekar Burumbadkar

भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून प्रसाद अर्पण केला जातो.  तुळशी विवाहाच्या शुभ प्रसंगी  गोड पदार्थ आणि उसाच्या रसाचा नैवेद्य म्हणून दाखवला जातो. यासोबतच, पंचामृत आणि इतर पारंपरिक मिठाई व फळे यांचाही नैवेद्य म्हणून वापर केला जातो. जर तुम्ही अर्पण प्रसादाची रेसिपी शोधत असाल तर आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत गाजराचा लाडू. चला तर मग जाणून घेऊया गाजराचा लाडू कसा बनवायचा…

साहित्य

  • किसलेला गाजर
  • कंन्डेन्स मिल्क
  • खवलेला नार
  • मावा आणि सुका मेवा
  • तूप

कृती

  • एका पॅनमध्ये तूप गरम करून घ्या.
  • या तूपात गाजराचा किस तीन मिनिटांपर्यंत चांगला परतवून घ्या.
  • त्यात किसलेला नारळ टाकून हे मिश्रण चांगलं मंद आचेवर परतवून घ्या.
  • त्यात कंन्डेन्स मिल्क टाका. हे मिश्रण पॅनला चिकटणार नाही याची काळजी घ्या. हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत ढवळून घ्या.
  • नंतर त्यात मावा घाला. मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या. काही वेळ हे मिश्रण थंड करा आणि मग त्याचे लाडू वळा.
  • सुका मेवा टाकून लाडू गार्निश करून घ्या.

ताज्या बातम्या