सणवार म्हटला की गोडधोड पदार्थांचा बेत आलाच! अशावेळी लाडू, बासुंदी, खीर, मोदक असे अनेक गोडाधोडाचे पारंपरिक पदार्थ केले जातात, परंतु यापैकी हमखास घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हणजे मोदक. सणावारानिमित्त केल्या जाणाऱ्या मोदकालाच थोडा ट्विस्ट देऊया. चला तर मग जाणून घेऊया गुलकंद मोदक कसा बनवायचा…
साहित्य
- तांदळाचे पीठ
- पाणी – १ कप
- तूप – १ चमचा
- मीठ – चिमूटभर
सारणासाठी
- गुलकंद – ½ कप
- सुका मेवा (बदाम, काजू, पिस्ता बारीक चिरलेला) – ¼ कप
- वेलची पूड – ½ चमचा
कृती
- एका पातेल्यात १ कप पाणी उकळायला ठेवा.
- त्यात चिमूटभर मीठ आणि १ चमचा तूप घाला.
- पाणी उकळल्यावर त्यात तांदळाचे पीठ घालून नीट ढवळून घ्या.
- झाकण ठेवून ५ मिनिटे वाफ येऊ द्या.
- नंतर हे पीठ प्लेटमध्ये काढून हाताने मळून मऊसर उकड तयार करा.
- एका भांड्यात गुलकंद, बारीक चिरलेला सुका मेवा, वेलची पूड एकत्र करून सारण तयार करा. मिश्रण छान चिकटसर आणि गोडसर होईल.
- उकडीच्या पीठाचा लहान लाडूसारखा गोळा घ्या.
- बोटांच्या साहाय्याने हलक्या हाताने तो गोळा दाबून पातळ उघडा.
- मध्ये गुलकंदाचं सारण भरा.
- हलक्या हाताने मोदकाच्या कडा गोळा करून टोकाला वळा व मोदकाचा आकार द्या.
- एका पातेल्यात वाफ आणण्यासाठी पाणी गरम करा.
- त्यावर मोदक ठेवण्यासाठी मोदक पात्र ठेवा.
- मोदकावर हलकं पाणी शिंपडा म्हणजे ते फुटणार नाहीत.
- झाकण ठेवून १०-१२ मिनिटे वाफवा.
