MP Breaking News
Fri, Dec 12, 2025

Astro Tips : रस्त्याने चालताना या गोष्टी चुकूनही ओलांडू नका अन्यथा…

आपल्याला चालताना अनेकदा रस्त्यावर विविध वस्तू पडलेल्या दिसून येतात. परंतु आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. रस्त्यावरुन चालताना काही गोष्टी ओलांडल्यास समस्यांना तोंड द्यावे लागते.

रस्त्याने चालत असताना अनेकवेळा आपण त्या ठिकाणी पडलेल्या वस्तू पाहतो, ज्या अत्यंत अशुभ मानल्या जातात. त्यामुळे या गोष्टींना ओलांडू नये किंवा स्पर्श करू नये आणि त्यांना दुरूनच टाळणे चांगले आहे. चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे…

लिंबू-मिरची

लिंबू-मिरचीचा उपयोग वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी केला जातो आणि असे मानले जाते की ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात. त्यामुळे, रस्त्यावर पडलेल्या लिंबू-मिरचीवर पाय ठेवल्यास ती व्यक्ती त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव स्वतःवर घेते. जर लिंबू मिरची रस्त्यावर पडलेली दिसेल तर तिला ओलांडू नका किंवा स्पर्ष करू नका. त्यावर जर तुमचा पाय पडला तर नकारात्मक उर्जेचा जीवनावर प्रभाव पडतो आणि जीवनात विविध अशुभ घटना घडू लागतात. तुमच्या कामात अडचणी उभ्या राहतात असे म्हणतात.

केसांचा गुच्छ

रस्त्यावर केसांचा गुच्छ दिसल्यास, ज्योतिषशास्त्रानुसार त्याला स्पर्श न करता पुढे जावे, कारण असे मानले जाते की हे नकारात्मक शक्तींशी संबंधित असू शकते किंवा काळ्या जादूचा वापर असू शकतो. या गोष्टीमुळे कामात अडथळे येऊ शकतात. केसांचा वापर अनेकदा अशुभ विधी आणि काळ्या जादूसाठी केला जातो, म्हणूनच रस्त्यावर केसांचा गुच्छ दिसल्यास त्याला स्पर्श न करता निघून जाण्याचा सल्ला दिला जातो. केसांच्या गुच्छाला ओलांडल्याने तुम्ही ज्या कामासाठी बाहेर पडला आहात, त्यात अपयश येण्याची शक्यता आहे.

जळलेला नारळ

रस्त्यावर जळलेला नारळ दिसल्यास, त्याला स्पर्श न करण्याची किंवा त्याला हात न लावण्याची खबरदारी घ्यावी, कारण ते सहसा वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी किंवा अशुभ गोष्टींपासून वाचण्यासाठी केले जाते. असे मानले जाते की जळलेला नारळ वाईट गोष्टींचा भाग असतो आणि त्याला स्पर्श करणे टाळणेच योग्य आहे. नारळाचा वापर बहुतेकदा पूजा किंवा काही विशेष विधीमध्ये केला जातो. पण, जर नारळ जाळला तर ते खूप अशुभ मानले जाते. जर तुम्हाला रस्त्याच्या डाव्या बाजूला किंवा घराबाहेर जळालेला नारळ दिसला तर तुम्ही ते टाळावे.

हळद-कुंकू-तांदूळ

रस्त्यावर किंवा चौकात उतरून टाकलेले हळदी-कुंकू, तांदूळ किंवा कापूर दिसला तर ते ओलांडणे टाळा. ते ओलांडल्यानं जीवनात अपयश, नातेसंबंधांमध्ये दुरावा आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)