वास्तुशास्त्रातील घराबाबत दिलेल्या अशा अनेक गोष्टीसंदर्भात आपल्याला माहित नसतं. त्यातीलच एक म्हणजे दारामागे कपडे टांगणे.आपल्यापैकी अनेकांना घरात दारामागे असलेल्या हुकवर कपडे टांगण्याची सवय असते. पण तुम्हाला माहितीये का की या सवयींचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार, घरात येताच कपडे योग्य ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा वास्तु दोष निर्माण होतो. वास्तूशास्त्रात कपडे ठेवण्याचं योग्य स्थान सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रानुसार दारामागे कपडे टांगणे हे शुभ की अशुभ असतं ते जाणून घेऊयात…
दारामागे कपडे टांगणे शुभ की अशुभ
दारामागे कपडे लटकवणे वास्तुशास्त्रानुसार चुकीचे आहे. या सवयीमुळे घरात नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडचणी येऊ शकतात. वास्तुशास्त्रानुसार, घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येण्यासाठी दारामागे कपडे न ठेवता योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे आहे.
नकारात्मक ऊर्जा
वास्तुशास्त्रानुसार, दाराच्या मागे कपडे लटकवल्याने घरात येणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह थांबतो. दरवाजा हा घरात ऊर्जा आणण्याचे प्रवेशद्वार आहे. दारामागे कपडे लटकवल्याने ही ऊर्जा अडते. दारामागे कपडे लटकवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि उर्जेचा प्रवाह रोखला जातो.
वास्तुदोष निर्माण होतो
घरात येताच कपडे योग्य ठिकाणी न ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो. दारामागे कपडे लटकवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते आणि वास्तुदोष निर्माण होतो. ही सवय घरात गोंधळ वाढवते आणि आर्थिक समस्या, कुटुंबात वाद आणि मानसिक तणाव यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते.





