Vastu Tips : नटराजाची मूर्ती घरी ठेवणे किंवा भेट देणे योग्य की अयोग्य ? जाणून घ्या

Asavari Khedekar Burumbadkar

नटराजाची मूर्ती घरी ठेवणे किंवा भेट देणे योग्य आहे, पण काही वास्तुशास्त्र नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊयात…

नटराजाची मूर्ती भेट देणे योग्य आहे का?

जर तुम्ही एखाद्याला नटराजाची मूर्ती भेट देत असाल, तर ती मूर्ती शांत आणि आनंदी भावातील असावी, जेणेकरून ती भेट देणाऱ्या व्यक्तीच्या घरात सुख-शांती नांदेल. जर तुम्ही एखाद्याला नटराजाची मूर्ती भेट देत असाल, तर ती मूर्ती आनंदी चेहऱ्याची आहे का, याची खात्री करा. भेट घेणाऱ्या व्यक्तीला ती मूर्ती ठेवण्यासाठी योग्य जागा आणि नियम समजावून सांगा.

नटराजाची मूर्ती घरी ठेवण्याचे नियम

मूर्तीची निवड

मूर्तीचा चेहरा प्रसन्न, आनंदित आणि शांत असावा. नटराज हे शिवाचे वैश्विक नृत्य रूप आहे. मूर्तीचा चेहरा आनंदी आणि शांत असावा. जर चेहऱ्यावर क्रोध किंवा उग्र भाव असतील, तर ती मूर्ती घरात ठेवू नये. कारण हे कलह आणि अशांतता आणू शकते. रौद्र किंवा तांडव करणारे क्रोधीत चेहऱ्याचे रूप घरात ठेवू नये, कारण हे विनाशाचे प्रतीक मानले जाते आणि घरात कलह निर्माण करू शकते.  

योग्य दिशा

नटराजाची मूर्ती घराच्या ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशेला ठेवणे उत्तम मानले जाते. जिथे शिव राहतात,ही मूर्ती ठेवल्यास शुभ आणि सकारात्मक ऊर्जा येते, असेही सांगितले जाते. 

स्थान

मूर्ती नेहमी स्वच्छ, शांत आणि पवित्र ठिकाणी ठेवावी, जसे की देवघर किंवा हॉलमध्ये, पण ती जमिनीवर नसावी, तर एका चौकीवर असावी.

काय टाळावे

नटराज हे सृष्टी आणि विनाशाचे प्रतीक असल्याने, काही लोक रौद्र रूप टाळतात. त्यामुळे मूर्तीची निवड महत्त्वाची आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या