हिंदूधर्मामध्ये तुळशीला अत्यंत पवित्र स्थान मिळाले आहे. कोणत्याही पूजेला किंवा देवाला नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुळशीचे पान ठेवले जाते. अनेक घरांमध्ये तुळशीची पूजा देखील केली जाते. ग्रंथांच्या मान्यतेनुसार, श्री हरी विष्णूंना तुळस अत्यंत प्रिय आहे. दररोज सकाळी तुळशीच्या रोपाची पूजा केल्यामुळे तुम्हाला धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. विष्णू पूजेत तुळशीची पाने तसेच तुळशीच्या मंजिरी अर्पण केल्यास अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता वाढते. याशिवाय उत्पन्नातही वाढ होते.
तिजोरीत तुळशीच्या मंजिऱ्या ठेवण्याचे फायदे
तुळशीच्यामंजिऱ्या तिजोरीत ठेवल्याने पैसा आकर्षित होतो. तुळस घरात सकारात्मक ऊर्जा आणते आणि आर्थिक समृद्धीसाठी मदत करते असे मानले जाते. यासाठी, शुक्रवारी काही मंजिऱ्या घेऊन पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडात बांधून तिजोरीत ठेवल्याने आर्थिक लाभ होतो.
आर्थिक समृद्धी
तिजोरीत मंजुऱ्या ठेवल्यास संपत्तीत वाढ होते. या उपायामुळे आर्थिक अडचणी कमी होतात.
सकारात्मक ऊर्जा
तुळशीच्या मंजुऱ्यांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे घरात शांतता आणि समृद्धी नांदते. घरात शांततामय वातावरण राहते आणि कौटुंबिक समस्या दूर होतात.
आर्थिक संकट
मंजुऱ्या तिजोरीत ठेवल्याने आर्थिक संकट टळते आणि पैशांचा ओघ सुरु राहतो. मंजुऱ्यांमधून निघणारी सकारात्मक ऊर्जा पैशांचा ओघ सुरू ठेवते आणि घरात समृद्धी आणते.
कौटुंबिक समस्या
वास्तूशास्त्रानुसार, तुळशीच्या मंजुळा घराच्या तिजोरीत ठेवल्याने सर्व त्रास दूर राहतात. त्यामुळे घरात शांततेचे वातावरण राहते. यामुळे घरात शांततापूर्ण वातावरण राहते आणि कुटुंबातील सदस्यांमधील त्रास कमी होतात.
कसे ठेवावे
- शुक्रवारी तुळशीच्या काही मंजुऱ्या (फुले) तोडा.
- या मंजुऱ्या पिवळ्या किंवा लाल रंगाच्या कापडात गुंडाळा.
- हे कापडी पुडी तुमच्या घरातील तिजोरीत ठेवा.
- या उपायाने घरात पैसा आकर्षित होतो आणि लक्ष्मीची कृपा राहते.
- असे केल्याने घरात पैशाचा प्रवाह सुरु राहील आणि आर्थिक अडचणी दूर होतील.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





