अन्नपूर्णा जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते. यावर्षी अन्नपूर्णा जयंती कधी आहे आणि अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी काय करावे हे जाणून घेऊयात…
कधी आहे अन्नपूर्णा जयंती ?
पंचांगानुसार, अन्नपूर्णा जयंती मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा तिथी गुरुवारी, 4 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी सुरू होईल. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी, 5 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजून 43 मिनिटांनी संपेल. चंद्रोदयाच्या वेळेनुसार, मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबर रोजी आहे, यामुळे अन्नपूर्णा जयंती 4 डिसेंबर 2025 रोजी साजरी केली जाणार आहे.

अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व
अन्नपूर्णा जयंती या दिवशी अन्नपूर्णा देवीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी नांदते, कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही आणि कुटुंबातील दुःख दूर होतात. ही जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेला साजरी केली जाते आणि या दिवशी अन्नदान करणे अत्यंत फलदायी मानले जाते. या दिवशी गरजूंना अन्नदान करण्याचे विशेष महत्त्व आहे. यामुळे देवी प्रसन्न होते आणि अन्नपूर्णा देवीची कृपा प्राप्त होते. अन्नपूर्णा देवी ही पार्वती देवीचा एक अवतार आहे, जी जगाला अन्न आणि पोषण प्रदान करते. अनेक लोक या दिवशी उपवास करतात आणि देवीची आराधना करतात.
अन्नपूर्णा जयंतीला काय करावे
- मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी अन्नपूर्णाची पूजा करा.
- अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
- यानंतर देवघर गंगाजल टाकून स्वच्छ करा.
- या दिवशी तुम्ही उपवास करणार असाल तर उपवास करण्याचा संकल्प करा.
- देवघराच्या जवळ अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवा.
- अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती किंवा फोटो समोर धूप आणि दिवा लावा.
- पूजेसाठी हळद, कुंकू, अक्षदा, नैवेद्य, तुळशीची पाने ठेवा.
- पूजेनंतर खीर किंवा इतर आवडते पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करा.
- पूजा करताना अन्नपूर्णा देवीच्या स्त्रोतांचा आणि मंत्रांचा जप करा.
- यासोबतच देवीला अक्षदा, फुले समर्पित करा.
- पूजा संपल्यानंतर कुटुंबातील सदस्यांना या प्रसादाचे वाटप करा.
- पूजेमध्ये देवीचा मंत्र ‘ओम अन्नपूर्णाय नमः’ चा 108 वेळा जप करा.
- शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करा. अन्नदानाने तुम्हाला वर्षभर अन्नदानाच पुण्य मिळते.











