Jagannath Puri : जगन्नाथ मंदिरात अविवाहित प्रेमी जोडप्यांना का आहे प्रवेश बंदी? जाणून घ्या रहस्य

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदू धर्मातील चारधाम पैकी एक म्हणजे पुरीचे जगन्नाथ मंदिर. हे देवस्थान श्री हरी विष्णूंचा अवतार श्रीकृष्णाला समर्पित आहे. जगन्नाथ येथील मंदिराचे अनेक रहस्य आहेत. ज्यामध्ये अविवाहित जोडपे येथे दर्शनासाठी एकत्र येत नाहीत. काय आहे कारण जाणून घेऊयात…

अविवाहित प्रेमी जोडप्यांना जगन्नाथ मंदिरात आहे प्रवेश बंदी

जगन्नाथ मंदिराशी संबंधित अनेक गोष्टी आणि नियम आहेत. त्यानुसार, अविवाहित जोडप्यांनी या मंदिरात प्रवेश बंदी आहे. एका पौराणिक कथेनुसार, राधा राणीने एकदा जगन्नाथ मंदिरात जाऊन जगन्नाथाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली. या इच्छेने ती जगन्नाथ मंदिरात पोहोचली पण ती मंदिरात जाण्यासाठी पाऊल टाकताच पुजाऱ्याने तिला दारातच थांबवले. पुजाऱ्याच्या या वागण्याने राधाराणी आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांनी याचे कारण विचारले. तेव्हा पुजारी म्हणाले की देवी, तुम्ही श्रीकृष्णच्या प्रेमिका आहात, त्यांची विवाहित पत्नी नाही. त्यामुळे तुम्हाला जाता येणार नाही. पुजाऱ्याचे हे म्हणने एकूण राधाराणीला खूप राग आला आणि त्यांनी पुजाऱ्याला शाप दिला की, या पुढे जर कोणी अविवाहित जोडपे या मंदिरात एकत्र आले तर त्यांना आयुष्यभर प्रेम मिळणार नाही. असे म्हणतात की, या शापामुळे एकही अविवाहित जोडपे जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी एकत्र जात नाही.

मंदिराशी संबंधित रहस्ये

जगन्नाथ पुरी येथील मंदिरात प्रसाद शिजवण्यासाठी एकावर एक ठेवलेल्या सात भांड्यांपैकी, वरचे भांडे प्रथम शिजते आणि सर्वात खालचे भांडे शेवटी शिजते. हे स्वयंपाकघर जगातील सर्वात मोठ्या स्वयंपाकघरांपैकी एक मानले जाते आणि ही प्रक्रिया “अण्णा प्रसाद भोग” म्हणून ओळखली जाते, जी शतकानुशतके प्रचलित आहे. ही प्रक्रिया देवाने केलेला चमत्कार मानली जाते. असे मानले जाते की हे लक्ष्मी देवी आणि अन्नपूर्णा देवी यांच्या आशीर्वादाने होते. 

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

ताज्या बातम्या