मीठा शिवाय अन्न अळणी लागते. ते वाया घालवणे म्हणजे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा अपमान आहे. त्यामुळे होणारे नुकसान याबद्दल जाणून घेऊया…
ताटात मीठ टाकून देणे अशुभ
वास्तुशास्त्रानुसार, जेवणानंतर ताटात मीठ उरले तर ते तसेच टाकून देऊ नये, कारण यामुळे अन्नपूर्णा आणि लक्ष्मी देवी रागावते. आर्थिक नुकसान होऊ शकते. ताटातील अन्न वाया घालवणे किंवा उरलेले मीठ तसेच टाकून देणे हे अन्नपूर्णेचा आणि लक्ष्मीचा अपमान मानले जाते. यामुळे घरात पैशांची चणचण भासते, कष्ट करून मिळवलेला पैसा टिकत नाही आणि कर्जबाजारीपणा येऊ शकतो.
आर्थिक नुकसान
ताटात मीठ शिल्लक ठेवणे किंवा ते टाकून देणे हे लक्ष्मीचा अपमान मानले जाते, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते, असे वास्तुशास्त्र सांगते.
अन्नपूर्णा देवीचा आदर
अन्न हे पूर्णब्रह्म मानले जाते. अन्नाचा अपमान करणे म्हणजे अन्नपूर्णा देवीचा अपमान करणे होय, म्हणूनच ही सवय टाळणे महत्त्वाचे आहे.
काय करावे?
जेवणानंतर ताटात मीठ शिल्लक राहिल्यास त्यावर थोडे पाणी टाकावे. असे करताना मनातल्या मनात अन्नपूर्णा मातेची आणि लक्ष्मी मातेची माफी मागावी, असे केल्याने त्यांची कृपा टिकून राहते.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)





