हिंदू धर्मात तुळशीच्या लग्नाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. दरवर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा करण्याची परंपरा आहे. तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते असे म्हणतात. या दिवशी तुळशी आणि भगवान विष्णू यांचे शालिग्राम रूप यांचा विवाह लावला जातो, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वांना प्रसाद दिल जाते. तुळशी विवाहाला ओल्या नारळाची खीर नैवेद्य म्हणून बनवायला अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया ओल्या नारळाची खीर कशी बनवायची.
ओल्या नारळाची खीर

साहित्य
- 1 लिटर फुल क्रीम दूध
- कच्चे नारळ
- साखर
- काजू
- बदाम
- मनुके
- वेलची पावडर
कृती
- खीर बनवण्यासाठी कढईत दूध गरम करा.
- कच्चे खोबरे फोडून, सोलून, बारीक चिरून मिक्सरमध्ये वाटून घ्या.
- दुधाला उकळी आली की त्यात खोबरे घालून मध्यम आचेवर शिजू द्या.
- खीर घट्ट झाल्यावर त्यात ड्रायफ्रुट्स, साखर आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
- सर्व काही मध्यम आचेवर शिजू द्या, नारळ आणि सुका मेवा शिजल्यावर गॅस बंद करा आणि प्रसाद देण्यासाठी एका भांड्यात बाहेर काढा.