Dev Uthani Ekadashi 2025 : चातुर्मास कधी संपणार? जाणून घ्या देवउठनी एकादशीचे महत्त्व

हिंदू धर्मात देवउठनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. हा दिवस तुळशी विवाह म्हणूनही साजरा केला जातो. देवउठनी एकादशीच्या दिवसापासून लग्न आणि इतर शुभकार्यांना सुरुवात होते.

हिंदू धर्मात देवउठनी एकादशीचे विशेष महत्त्व आहे. देवउठनी एकादशीच्या दिवसापासून लग्न आणि इतर शुभकार्यांना सुरुवात होते. देवउठनी एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. हिंदू धर्मात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योगिक निद्रेनंतर जागे होतात आणि शुभकार्ये पूर्ण होतात. 

चातुर्मास कधी संपणार?

आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि देवउठनी एकादशीला जागे होतात. या कालावधीत शुभ कार्ये थांबवलेली असतात. या एकादशीच्या दिवसापासून पुन्हा विवाह, गृहप्रवेश इत्यादींसारखी सर्व शुभ कार्ये सुरू होतात. या दिवशी तुळशी-शालिग्राम विवाह उत्सव साजरा केला जातो आणि घरात संपत्ती व समृद्धी आणण्यासाठी विविध उपाय केले जातात. 

शुभ कार्यांना सुरुवात

देवउठनी एकादशी या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात होते. एकादशी तिथी 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. आणि एकादशी तिथी 2 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजून 31 मिनिटांनी संपेल. एकादशी व्रत शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 रोजी केले जाईल.

देवउठनी एकादशीचे महत्त्व

देवउठनी एकादशीचे महत्त्व हे आहे की या दिवशी चार महिन्यांच्या निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात, ज्यामुळे चातुर्मासाची समाप्ती होते आणि सर्व शुभ व मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतात.  या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या ‘योगनिद्रे’तून बाहेर येतात, त्यामुळे याला ‘प्रबोधिनी एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News