श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. भगवान शिवाचे भक्त श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी उपवास करतात, शिवलिंगाचा अभिषेक करतात आणि भगवान शिवाला विविध वस्तू अर्पण करतात. पण केतकीचे फूल भगवान शंकराला का अर्पण करू नये याबद्दल जाणून घेऊया…
पौराणिक कथा
कथेनुसार, एकदा ब्रह्मा आणि विष्णूमध्ये श्रेष्ठ कोण यावरून वाद झाला. त्यावेळी भगवान शंकराने ज्योतिर्लिंगाचे रूप धारण केले आणि सांगितले की जो कोणी या ज्योतिर्लिंगाचा आदि किंवा अंत शोधेल तो श्रेष्ठ ठरेल. खूप शोध घेतल्यानंतरही जेव्हा भगवान विष्णूंना शिवलिंगाचा अंत सापडला नाही, तेव्हा त्यांनी हार पत्करली आणि भगवान शंकरासमोर आपली चूक कबूल केली. ब्रह्माजी ज्योतिर्लिंगाचा अंत शोधण्यासाठी खाली गेले आणि केतकीचे फूल सोबत घेऊन आले. त्यांनी केतकीच्या फुलाला खोटे बोलण्यास सांगितले की, त्याने ज्योतिर्लिंगाचा अंत पाहिला आहे. भगवान शंकरांना सत्य माहिती असल्याने त्यांनी ब्रह्माजी आणि केतकीच्या फुलावर क्रोधित होऊन त्यांना शाप दिला की, यापुढे केतकीचे फूल माझ्या पूजेत वापरले जाणार नाही.
केतकीला शाप कसा मिळाला?
केतकीच्या फुलाला शंकराच्या पूजेसाठी शाप मिळाला, कारण त्याने ब्रह्मदेवाच्या खोट्या साक्षीला साथ दिली होती. हे ऐकून शिव क्रोधित झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला खोटे बोलल्याबद्दल शाप दिला की त्याची पूजा केली जाणार नाही. तसेच, केतकीच्या फुलालाही शाप दिला की ते शंकराच्या पूजेसाठी वापरले जाणार नाही, म्हणून, केतकीचे फूल शंकराच्या पूजेसाठी वापरले जात नाही.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





