श्रावणात महादेवांची पूजा भक्त मोठ्या भक्तीभावाने करत असतात. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वात शुभ मानला जातो. तर यावर्षी 25 जुलै 2025 रोजी श्रावण महिना सुरू होत आहे. श्रावण महिना पवित्र महिना आणि शिवभक्तांसाठी तर त्यांच्या आराध्य महादेवांना प्रसन्न करण्याचा महिना आहे. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांची मनोभावे पूजा शिवभक्त करतात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महादेवांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं. त्याचबरोबर श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिवभक्त महादेवांना शिवामूठ अर्पण करतात. हीच शिवामूठ म्हणजे काय आणि श्रावणातच ती का वाहिली जाते हे जाणून घेऊयात…
श्रावणात महादेवांना शिवामूठ का वाहिली जाते ?
श्रावणात महादेवांना शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे, कारण श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित आहे आणि या महिन्यात त्यांची विशेष पूजा केली जाते. शिवामूठ म्हणजे, नैवेद्याच्या स्वरूपात महादेवाला अर्पण करण्यात येणारी धान्याची मूठ. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ वाहिली जाते. यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
श्रावणातच शिवामूठ का वाहिली जाते ?
श्रावण महिना भगवान शंकराचा प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात शंकराची विशेष पूजा केली जाते. याच महिन्यात भगवान शिव कैलासावर वास्तव्याला येतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे, या महिन्यात शिवामूठ अर्पण करणे शुभ मानले जाते. या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांच्या कृपेसाठी शिवामूठ अर्पण केली जाते.
शिवामूठ वाहण्याचे फायदे
- शिवामूठ अर्पण केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात.
- शिवामूठ वाहणे म्हणजे धान्याची पूजा करणे. यामुळे घरात धान्याची वाढ चांगली होते.
- शिवामूठ अर्पण केल्याने नैसर्गिक आपत्तींपासून संरक्षण मिळते.
शिवामूठ कशी वाहावी?
श्रावण महिन्यात महादेवांना शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची मूठ शंकराच्या पिंडीवर वाहिली जाते. यामुळे सुख-समृद्धी येते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
- श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे.
- महादेवाचे ध्यान करावे.
- शिवपिंडीवर अभिषेक करावा.
- शिवपिंडीला बेल, फुले, धूप, दीप इत्यादी अर्पण करून पूजा करावी.
- घरातील स्त्रिया हातामध्ये एक मूठ धान्य घेऊन ‘ॐ नमः शिवाय’ असा जप करत, त्या धान्याची शिवामूठ शंकराला वाहावी.
- नैवेद्य दाखवून आरती करावी.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)





