Prithviraj Chavan : येत्या 19 डिसेंबरला संपूर्ण जगात एक मोठा राजकीय भूकंप होईल. त्याचे पडसाद आपल्या भारतावर पाहायला मिळेल आणि एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असं मोठं बागेत काँग्रेसचे तिकडे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केल आहे.पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं. जो कोणी नवीन मराठी पंतप्रधान होईल तो भाजपचाच असेल तो काँग्रेसचा नसेल असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी त्यामागे अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला आहे.
पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले? Prithviraj Chavan
आपल्या भाषणात पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला कल्पना नाही, पण अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच यामुळे एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. जो देशाचा नवा पंतप्रधान असेल तो काँग्रेसचा नसेल कारण आमच्याकडे काही बहुमत नाही असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. Prithviraj Chavan
अमेरिकेत जेफ्री एपस्टाईन फाईल्समुळे तुफान आले आहे. त्यात ट्रम्प यांचे सिंहासन सुद्धा डामाडौल होताना दिसत आहेत. डेमोक्रॅटिक समितीच्या सदस्यांनी चौकशी थांबणार नसल्याचे आणि अहवाल सार्वजनिक करण्याचे सुतोवाच केलेले आहे. या समितीने काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री यांच्यासोबतचे 19 फोटो सार्वजनिक केले. त्यावरून अमेरिकेत राजकीय खळबळ उडाली आहे. याच्याच आधारे पृथ्वीराज चव्हाण दावा करत असल्याचे बोलत आहेत
पृथ्वीराज चव्हाण मोठे नेते
दरम्यान पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रदीर्घ काळ पीएमओ कार्यालयात काम केलेले आहे. दिल्लीत त्यांचे अजूनही चांगले संबंध आहेत. विशेष म्हणजे या महिन्यात त्यांनी दुसऱ्यांदा हा दावा केला आहे.





