आपल्यापैकी अनेकजण दररोज सकाळी देवपूजा करतात. काही लोक तर सायंकाळच्यावेळी देखील देवाची प्रार्थना करतात. मात्र तुम्ही कधी या गोष्टीचा अनुभव घेतला आहे का? की जेव्हा तुम्ही देवपूजा करत असता किंवा देवाची प्रार्थना करत असता तेव्हा तुम्हाला अचानक जांभई येते. त्याचा अर्थ काय असतो? हे जाणून घेऊयात.
पूजा करताना जांभई का येते?
शास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला पूजा करताना झोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की ती व्यक्ती पूर्णपणे देवाशी समर्पित नाही. एकाग्रता कमी आहे. तुमचे मन पूर्णपणे पूजेत रमलेले नाही. विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा शरीर पूजेत बसलेले असते आणि मन दुसरीकडे कुठेतरी धावत असते, तेव्हा लक्ष विचलित होऊ लागते आणि मन थकून जाते. याच थकव्यामुळे जांभई येते. अनेकदा, दिवसभराच्या थकव्यामुळे शरीर आरामाची गरज व्यक्त करत असते आणि मन पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही.

जांभई येणे टाळण्यासाठी काय करावे?
पूजा करताना असे वारंवार होत असेल तर सर्वप्रथम तुमचे मन शांत करा. जेव्हा जेव्हा असे होईल तेव्हा पाच मिनिटे ध्यान करा. याशिवाय, तुम्ही मंत्रांचा जप करूनही तुमचे मन शांत ठेवू शकता. तुम्ही ओम किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप देखील करू शकता. या दरम्यान, तुमच्या आजूबाजूच्या गोष्टी विसरून जा आणि फक्त या मंत्रावर लक्ष केंद्रित करा. हळूहळू तुमचे मन शांत होऊ लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











