या दिवशी कधीही बूट खरेदी करू नका; अन्यथा पश्चात्तापाची वेळ येईल

शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. या दिवशी बूट खरेदी केल्याने शनिदेव नाराज होतात. शनिदेव नाराज झाल्याने नोकरीत अडथळे येऊ शकतात

बूट किंवा चप्पल हे आपले जीवनावश्यक वस्तू आहे. पायात बूट किंवा चप्पल असल्याशिवाय आपण घराबाहेर पडू शकत नाही. त्यामुळे साहजिकच नवनवीन बूट खरेदी करण्याकडे अनेक तरुणांचा कल असतो. बूट खरेदी करणे ही तसं म्हटलं तर सामान्य गोष्ट आहे. परंतु, अध्यात्मानुसार काही विशिष्ट दिवशी बुटांची खरेदी करणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. हे दिवस नेमके आहेत तरी कोणते ते आपण सविस्तर जाणून घेऊयात.

शनिवारी खरेदी करू नका बूट

शनिवार हा शनिदेवाचा दिवस आहे. या दिवशी बूट खरेदी केल्याने शनिदेव नाराज होतात. शनिदेव नाराज झाल्याने नोकरीत अडथळे येऊ शकतात, प्रवासात अपघात होण्याची शक्यता असते आणि आर्थिक अडचणी सुद्धा वाढतात. त्यामुळे शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवार च्या दिवशी बूट किंवा चप्पल खरेदी करणे टाळा.

अमावस्येला बूट खरेदी

अमावस्या हा पूर्वजांचा दिवस मानला जातो आणि या दिवशी नवीन वस्तू, विशेषतः बूट खरेदी केल्याने पूर्वज नाराज होण्याची शक्यता असते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते, आर्थिक फटका बसू शकतो आणि घरात वादविवाद सुद्धा होतात. अमावस्याच्या दिवशी बूट किंवा चप्पल खरेदी केल्यास आपलं आयुष्य अंधारमय होऊ शकते.

मंगळवारी बूट खरेदी करू नका

मंगळवार हा मंगळाचा दिवस आहे आणि या बूट खरेदी केल्याने मंगळ आणि शनि यांच्यातील शत्रुत्व वाढते. यामुळे अपघात, भांडणे आणि रक्ताशी संबंधित आजार होऊ शकतात. ज्योतिषशास्त्रात, मंगळ पायांना ऊर्जा प्रदान करतो. मंगळवारी बूट खरेदी केल्याने प्रवास कठीण होऊ शकतो.

रविवार

रविवार हा सूर्याचा दिवस आहे आणि बूट खरेदी केल्याने सूर्य आणि शनि यांच्यातील शत्रू संबंध सक्रिय होतात. यामुळे आत्मविश्वास कमी होऊ शकतो, कामात अडथळे येऊ शकतात आणि तुमच्या वडिलांसोबतचे संबंध ताणले जाऊ शकतात. त्यामुळे या दिवशी बूट खरेदी करणे टाळा.

शुभ दिवस कोणते

बूट खरेदी करण्यासाठी गुरुवार, शुक्रवार आणि बुधवार हे शुभ दिवस मानले जातात. या दिवशी बूट खरेदी केल्याने संपत्ती वाढते . घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते. तसेच तुम्ही करिअर मध्ये यशस्वी होऊ शकता.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News