Dream Astrology : मित्रानो, आपल्याला रात्री झोपल्यानंतर अनेकदा वेगवेगळी स्वप्ने पडतात (Dream Meaning). काही स्वप्न आनंदाची असतात तर काही स्वप्न भयावह असतात. तसेच अशी काही स्वप्न असतात जे तुमच्यासोबत भविष्यात ज्या -काही गोष्टी घडणार असतील त्याचे संकेत देतात. स्वप्न शास्त्रानुसार, आपण पाहत असलेल्या स्वप्नांचे आपल्या जीवनावर विविध परिणाम होतात आणि ते भविष्यातील घटना देखील दर्शवू शकतात. तुम्ही कधी स्वतःला स्वप्नात मृत झालेलं बघितलं आहे का?? चला तर मग या स्वप्नाचा अर्थ समजून घेऊया.
स्वतःच्या मृत्यूचे स्वप्न पाहण्याचा अर्थ काय?
स्वप्नशास्त्रानुसार, (Dream Astrology) जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतःला वारंवार मरताना दिसले तर त्याचा अर्थ असा की येणारे संकट किंवा मृत्यूचा धोका टळला आहे. म्हणून, जर तुम्हाला कधीही स्वतःच्या मृत्यूचे स्वप्न पडले तर घाबरून जाण्याची गरज नाही. उलट हे स्वप्न तुमच्यासाठी चांगले परिणाम देणारं असू शकते.

स्वप्नात स्वतःचा अपघात? Dream Astrology
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वतःला रस्ता अपघातात किंवा इतर कोणत्याही अपघातात अडकल्याचे स्वप्न पडले तर याचा अर्थ असा की भविष्यात काही संकटे येण्याची शक्यता आहे. अशावेळी, तुम्हाला सतर्क आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे.
स्वप्नात देव दिसणे
स्वप्नात देवाचे दर्शन होणे हे जवळपास अशक्य असतें कारण कोणाच्याही स्वप्नात देव येत नाही. जो खरा भक्त असतो त्यालाच देव स्वप्नात दिसतो. स्वप्न शास्त्रानुसार जर तुमच्या स्वप्नात देव आला तर याचा अर्थ असा होतो, की तुमच्यावर देवांची कृपा आणि आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यात काही संकटे असतील तर ती सुद्धा दूर जातील.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











