Chanakya Niti to recognize a true friend: प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात मित्रांचे महत्व विशेष असते. प्रत्येकालाच आपल्या मित्रांबाबत अभिमान असतो. अनेकांना नातेवाईकांपेक्षा आपल्या मित्रांवर जास्त विश्वास असतो. बऱ्याचवेळा मित्र आपल्या प्रगतीमध्ये आपल्याला सहकार्य करतात. पण अनेकदा असे काही मित्र असतात जे पाठीमागे तुमची प्रगती होऊ नये अशी अपेक्षा करतात. असे लोक खरे मित्र नसतात. बऱ्याच वेळ लोकांना सच्चा मित्र कोण हे ओळखणे कठीण होते.
आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये खरा मित्र कोण हे ओळखण्याचे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. आचार्य चाणक्यांनी चाणक्य नीतीमध्ये असे अनेक सल्ले आणि उपदेश दिले आहेत, ज्याच्या मदतीने सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक अशा विविध अडचणी दूर होतात. आजही लोक आपल्या अडचणी दूर करून सुखसमृद्धी मिळवण्यासाठी चाणक्य नीतीचा अवलंब करतात. त्यामुळेच आज आपण खरा मित्र कोण हे ओळखण्याचे सोपे नियम जाणून घेऊया….
अडचणीच्या काळात सोबत राहील-
आचार्य चाणक्यांच्या मते तुमच्या आनंदात तर अनेक लोक तुमच्या सोबत असतात. परंतु तुमच्या अडचणीच्या काळात जो तुमच्या सोबत असतो तो तुमचा खरा मित्र असतो. खरा मित्र तुम्हाला कधीच एकटा सोडत नाही. त्यामुळे अडचणीत साथ देणाऱ्या मित्राला नेहमीच जवळ ठेवा.
आर्थिक मदतीसाठी तयार असणारा-
आचार्य चाणक्यांच्या मते जो व्यक्ती तुम्हाला आर्थिक अडचणीत मदत करण्यास तयार असतो. किंवा तुमच्या सोबत उभा असतो तो तुमचा खरा मित्र आहे. खरा मित्र तुम्हाला कधीच पैसे द्यायला टाळाटाळ करत नाही. पैसे नसले तरी तुम्हाला मानसिक आधार देण्यास सक्षम असतो. असा व्यक्ती तुमचा खरा मित्र असतो.
आत्मविश्वास वाढविणारा-
चाणक्य नीतीनुसार, खरा मित्र कधीच तुम्हाला निराशा येऊ देत नाही. तो नेहमीच तुमचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करतो. तुमचा आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न करणारा व्यक्ती तुमचा खरा मित्र आहे.
पाठीमागे निंदा न करणारा-
चाणक्य नीतीनुसार, जो व्यक्ती तुमचा खरा मित्र असतो तो कधीच तुमच्यम मागे तुमची निंदा करत नाही. तो इतरांसमोर नेहमीच तुमचे कौतुक करतो. तो तुमच्या समोर कौतुक करणार नाही परंतु तुमच्या मागे तुमची स्तुती करेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





