Pakpola : “पाकपोळा” 100 वर्ष जुना पारंपारिक गोड पदार्थ, पाहा रेसिपी

पाकपोळा हा केवळ एक गोड पदार्थ नाही, तर तो एका संस्कृतीचा भाग आहे, ज्यात घरगुती प्रेम आणि सणासुदीच्या आनंदाची सांगड घातली जाते.

‘पाकपोळा’ ही एक जुनी आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी आहे, जी गोडवा, सणासुदीचा खास स्वाद आणि आठवणींचा एक अनोखा संगम आहे. ही रेसिपी म्हणजे आजीच्या हातची माया आणि आईच्या कौशल्याचे प्रतीक आहे आणि सणांच्या उत्सवात या पदार्थाची चव घेण्याची एक वेगळीच मजा आहे.  पाकपोळा हा सणांच्या आनंदात भर घालणारा एक खास पदार्थ आहे. चला तर मग जाणून घेऊया ‘पाकपोळा’ कसा बनवायचा.

साहित्य

  • मैदा – १ वाटी
  • साखर – १ कप
  • दही – २ चमचे
  • पाणी – १/२ कप
  • लिंबाचा रस – १ चमचा (साखर पाक क्रिस्टलाइज होऊ नये म्हणून)
  • बेकिंग सोडा
  • आरारोट पावडर
  • वेलचीपूड
  • ड्रायफ्रुट्स – सजवण्यासाठी ऑप्शनल (ऑप्शनल)
  • तेल / तूप

कृती

  • यासाठी सर्वप्रथम एका वाडग्यात एक कप मैदा घ्या
  • यांनतर मैद्यात साधारण दोन चमचे दही मिक्स करून मिश्रण तयार करून घ्या आणि १५ मिनिटे बाजूला ठेवून द्या
  • आता आपल्याला पाक तयार करण्यासाठी कढईत एक वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घालून गॅसवर शिजवा
  • साखरेचा हा पाक तयार होत असतानाच आपल्याला यात लिंबाचा रस घालायचा आहे.
  • घट्ट एकतारी पाक तयार झाला की यात वेलची पावडर मिसळा आणि गॅस बंद करा
  • आता तयार मैद्याच्या मिश्रणात आरारोट पावडर आणि बेकिंग पावडर मिक्स करायची आहे.
  • गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल अथवा तूप गरम करत ठेवा.
  • गरम होताच तयार पिठाचे पसरदार गोल गोळे तेलात सोडा, अगदी पॅनकेकप्रमाणे तुम्हाला ते तयार करायचे आहेत.
  • दोन्ही बाजूंनी छान तळून झाल्यानंतर यांना एका प्लेटमध्ये काढा आणि मग यांना साखरेच्या पाकात भिजवून बाहेर काढा.
  • फार वेळ याला पाकात भिजवून ठेवू नका, वरून ड्रायफ्रूट्सने सजवून तयार पाकपोळा खाण्यासाठी सर्व्ह करा.

 


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News