आपल्या जीवनात पैसा (Money Tips) खूप महत्वाचा आहे. पैसा असेल तरच माणसाला किंमत असते. पैसा नसेल तर कोणाला विचारलं सुद्धा जात नाही. परंतु हातात पैसा टिकवण्यासाठी काही गोष्टीचे पालन करणे सुद्धा आवश्यक आहे. जसे की कोणत्या दिवशी आर्थिक व्यवहार टाळावेत किंवा आठवड्यातील कोणत्या दिवशी कोणाला पैसे उधार देऊ नयेत हे सुद्धा लक्षात ठेवावे लागते. मित्रानो, तुम्हांला माहितेय का? आठवड्यात असा एक दिवस असतो जेव्हा कोणालाही पैसे उधार देऊ नयेत. जर कोणी असे केले तर देवी लक्ष्मी नाराज होते आणि त्या माणसाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते
आठवड्यातील कोणत्या दिवशी पैसे उधार देऊ नयेत?
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्रवारी कोणालाही पैसे उधार देऊ नये. असे केल्याने सौभाग्य कमी होईल. जर एखाद्या व्यक्तीने शुक्रवारी पैसे उधार दिले तर त्याला लवकरच आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा त्याने दिलेले पैसे गमावू शकतात. शुक्रवारच्या दिवशी एखाद्याला पैसे उदार दिल्याने घरात गरीबी येऊ शकते. या श्रद्धेमुळे बरेच लोक शुक्रवारी पैसे उधार देण्याचे टाळतात.
शुक्रवार पैसे उधार का देऊ नये? Money Tips
शुक्रवार हा देवी लक्ष्मीच्या पूजेचा दिवस आहे. जो कोणी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करतो, त्याला सर्व प्रकारचे सुख आणि आर्थिक सुख समृद्धी लाभते. अशा व्यक्तींना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. पैशाला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते. म्हणूनच, असे म्हटले जाते की या दिवशी कोणालाही उधार देणे म्हणजे एखाद्याचे सौभाग्य नष्ट करण्यासारखे आहे. या दिवशी पैशाची देवाणघेवाण केल्याने आपल्या आर्थिक अडचणी वाढू शकतात. Money Tips
देवी लक्ष्मी रागावते
असे म्हटले जाते की शुक्रवारी पैसे उधार देणाऱ्या आणि घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकावर देवी लक्ष्मी क्रोधित होते. देवी लक्ष्मी त्यांचे सौभाग्य देखील हिरावून घेते. अशा घराची वाटचाल ही गरिबीकडे जाते. म्हणून, शुक्रवारी कोणालाही उधार देणे टाळावे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





