Ram Mandir Ayodhya : राम मंदिरावर फडकणार 11 किलोचा झेंडा; मोदींच्या हस्ते होणार कार्यक्रम

Asavari Khedekar Burumbadkar

हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील भगवान श्रीरामाच्या मंदिराचे (Ram Mandir Ayodhya) संपूर्ण काम आता पूर्ण झालेला आहे. रामलल्लाच्या अभिषेकानंतर एक वर्ष आणि नऊ महिन्यांचा काळ पूर्ण झाला असून येत्या २५ नोव्हेंबर रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे हा झेंडा तब्बल 11 किलो वजनाचा असेल. हा भगवा रंगाचा ध्वज रामराज्याच्या परंपरेचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक असेल.

वारा आणि वादळातही फडकत राहील झेंडा

या झेंड्याची खास बाब म्हणजे तो पॅराशूट फॅब्रिकपासून बनवला आहे. किती मोठे वारे आणि वादळ आलं तरीही या झेंड्याला कसलाही धोका नाही, तो फडकतच राहील. या झेंड्यावर सूर्य, ‘ओम’ आणि कोविदार वृक्षाची चिन्हे आहेत. कोविदार हा अयोध्येचा राजवृक्ष आहे, ज्याला कचनार असेही म्हणतात. मंदिराच्या १६१ फूट उंच शिखरावर ४२ फूट स्तंभ उभारण्यात आला आहे. त्यावर २२ फूट लांब आणि ११ फूट रुंदीचा भगवा ध्वज फडकेल. भारतीय लष्कराच्या जवानांनी राम मंदिराच्या शिखरावर ध्वजारोहणासाठी सराव सुरू केला आहे. ध्वजारोहणाच्या दिवशी पंतप्रधान मोदींना मदत करण्यासाठी ते उपस्थित राहतील.

10 हजार पाहुण्यांना निमंत्रण- Ram Mandir Ayodhya

ध्वजारोहण समारंभासाठी दहा हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे आणि एकूण ३,००० खोल्या बुक करण्यात आल्या आहेत. मात्र २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण समारंभात, राम लल्लाचे दर्शन सामान्य भाविकांसाठी बंद असेल. ज्या व्यक्तींना ध्वजारोहण समारंभासाठी आमंत्रित केलेले आहे तेच लोक राम लल्लाचे दर्शन घेऊ शकतील.

राम मंदिरात (Ram Mandir Ayodhya) फडकवण्यात येणारा झेंडा नक्कीच अद्वितीय असेल. तो राम राज्याच्या दृष्टिकोनाचे प्रतीक असेल. खरं तर, ध्वजामध्ये राम राज्याचे राज्य प्रतीक कोविदार वृक्ष तसेच भगवान सूर्य, सूर्यवंश आणि सौहार्दाचे प्रतीक ओंकार यांचा समावेश असेल. त्याचा रंग भगवा असेल. पंतप्रधान मोदी २५ नोव्हेंबर रोजी ध्वजारोहण करतील.

ताज्या बातम्या