MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

श्रावणातल्या पाहिल्या सोमवारी जुळून आलाय शुभ योग! ‘या’ राशींचे भाग्य उजळणार

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार हा ५ राशींसाठी खूप खास आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना केल्यास, त्यांना प्रगती आणि समृद्धीचे आशीर्वाद मिळतील. या ५ राशी कोणत्या आहेत, हे जाणून घेऊया.

श्रावण महिन्यात काही राशींसाठी भाग्य उजळणार आहे आणि पैशाची चणचण दूर होईल. श्रावण महिन्यात पहिला सोमवार अनेक राशींसाठी खूप खास असणार आहे. कारण यावेळी ग्रहांची युती या राशींचे भाग्य बदलू शकते. श्रावण महिन्यात शिवपूजेने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. श्रावण महिन्यात कोणत्या राशींवर भोलेनाथाचा आशीर्वाद असेल. जाणून घेऊया…

पहिला श्रावणी सोमवारचे महत्व

श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात सोमवारी उपवास करून भगवान शंकराची पूजा केल्यास सुख, समृद्धी आणि मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 

या दिवशी काय करावे?

उपवास ठेवावा, शिवालयात जाऊन शिवलिंगावर अभिषेक करावा, ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा, घरात शिव-पार्वतीची पूजा करावी, गरिबांना दानधर्म करावा.

या दिवशी काय करू नये?

मांसाहार आणि मद्यपान टाळावे, खोटे बोलणे किंवा कोणालाही फसवणे टाळावे, क्रोध आणि नकारात्मक विचार टाळावेत.

मेष

मेष राशीसाठी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार खूप खास आहे.  या दिवशी मेष राशीच्या लोकांनी भगवान शंकराची पूजा करावी, ज्यामुळे त्यांना विशेष लाभ होतील. मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस नवीन संधी घेऊन येईल. ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना चांगली बातमी मिळू शकते. मेष राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा शुभ काळ आहे. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते.

 वृषभ 

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. या दिवशी त्यांना अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, तसेच आर्थिक लाभाचे योग आहेत. वृषभ राशीच्या लोकांसाठी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार खूप भाग्यवान आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, तसेच नवीन आर्थिक संधी मिळतील. ज्या लोकांचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार आहे, त्यांना भगवान शिवाच्या आशीर्वादाने यश मिळेल. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामातील अडथळ्यांवर मात करता येईल आणि यश मिळेल. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा दिवस शुभ असून त्यांना समाजात मान-सन्मान मिळेल.

कन्या

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार, कन्या राशीसाठी खूप खास आहे. या दिवशी, कन्या राशीच्या लोकांना मानसिक शांती आणि कौटुंबिक सुख लाभेल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा सोमवार विशेष फलदायी असणार आहे, कारण या राशीच्या लोकांना मानसिक शांती आणि कुटुंबासोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. 

वृश्चिक

वृश्चिक राशीसाठी श्रावण महिन्याचा पहिला सोमवार खूप शुभ आहे. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ असून त्यांना अनेक शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. या राशींच्या लोकांना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि अडथळ्यांमधून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

मीन

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार काही राशींसाठी खूप खास आहे. मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि श्रद्धेने भरलेला असेल. या दिवशी, भगवान शंकराची पूजा केल्याने विशेष लाभ मिळतात. या राशीच्या लोकांसाठी हा दिवस खूप शुभ आहे. त्यांना आत्मविश्वास आणि सकारात्मकतेचा अनुभव येईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)