कुरकुरीत आणि खमंग कोथिंबीर वडी एक अस्सल महाराष्ट्रीयन पाककृती आहे. नाश्त्यामध्ये मुलं घरी असल्यानंतर नेमकं काय बनवावं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही चमचमीत कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवू शकता. ही वडी मुलं आवडीने खातील. तसेच वडी बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.
साहित्य
- २ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
- १ कप बेसन पीठ
- १/४ कप तांदळाचे पीठ
- ४-५ हिरव्या मिरच्या (चवीनुसार)
- १ इंच आल्याचा तुकडा
- ६-७ लसणाच्या पाकळ्या
- १/२ चमचा जिरे
- १/२ चमचा हळद
- १ चमचा लाल तिखट (आवडीनुसार)
- १/२ चमचा गरम मसाला
- १/४ चमचा हिंग
- चवीनुसार मीठ
- तेल तळण्यासाठी
कृती
- एका मोठ्या भांड्यात कोथिंबीर, बेसन, तांदळाचे पीठ, जिरे, हळद, तिखट, गरम मसाला, हिंग, मीठ आणि बारीक वाटलेले मिरची, आले, लसूण एकत्र करा.
- पाणी घालून पीठ घट्ट भिजवा.
- भिजवलेल्या पिठाचे छोटे गोळे किंवा वड्या तयार करा.
- कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर वड्या सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
- गरमागरम कोथिंबीर वड्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह करा.





