कार्तिक महिन्याच्या द्वादशी तिथीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह (Tulsi Vivah 2025) केला जातो. या काळात तुळशीला नवीन नवरीप्रमाणे सजवले जाते.. यंदा २ नोव्हेंबर ला म्हणजेच रविवारी तुळशी विवाह आहे. या दिवशी विश्वाचे रक्षणकर्ते भगवान विष्णू आणि तुळशी माता यांचा विवाह केला जातो. असे मानले जाते की जे भक्त विहित विधींनुसार तुळशीच लग्न लावतात त्यांना सुख, समृद्धी आणि शाश्वत सौभाग्य मिळते. परंतु हे करत असताना, तुळशी विवाहाच्या दिवशी वास्तुशी संबंधित बाबींबद्दल सुद्धा खूप काळजी घेतली पाहिजे.
वास्तुशास्त्रानुसार, हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की घरात तुळशीचे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा येते. घरात तुळशीचे रोप ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते घराचे आणि घरातील लोकांचे रक्षण करते. अशावेळी आपण जाणून घेऊया तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीजवळ कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.

१) तुळशीला शिवलिंगापासून दूर ठेवा
वास्तुशास्त्रानुसार, तुळशी आणि शिवलिंग एकत्र ठेवू नये. तुळशीच्या झाडाजवळ शिवलिंग ठेवणे पाप मानले जाते. कारण भगवान शिवाने तुळशीचा पती शंखचूडाचा वध केला होता आणि म्हणूनच, तुळशी आणि शिवलिंगाची एकत्र पूजा केली जात नाही. Tulsi Vivah 2025
२) तुळशीजवळ बूट आणि चप्पल ठेवू नका.
वास्तुशास्त्रानुसार, बूट आणि चप्पलजवळ तुळशी ठेवल्याने देवी लक्ष्मी नाराज होते. तुळशी ही देवी लक्ष्मीचे निवासस्थान आहे आणि ती बूट आणि चप्पलजवळ ठेवल्याने तिचे पावित्र्य भंग होते. लक्ष्मीच्या कृष्णामुळे साहजिकच तुमच्या आर्थिक अडचणी वाढू शकतात. पैशाच्या संबंधी नवनवीन संकटे तुमच्यावर येऊ शकतात.. म्हणून, तुळशी नेहमी पवित्र आणि स्वच्छ ठिकाणी ठेवावी.
३) जवळ झाडू ठेवणे टाळा (Tulsi Vivah 2025)
शास्त्रानुसार, तुळशीच्या झाडाजवळ झाडू ठेवणे टाळावे. घर स्वच्छ करण्यासाठी झाडू वापरला जातो आणि हाच झाडू तुळशीजवळ ठेवल्याने तुळशीचा अनादर होतो. यामुळे घरात आर्थिक समस्या आणि त्रास होतात. म्हणून, तुळशीच्या रोपाजवळ झाडू ठेऊ नये.
४) तुळशीजवळ काटेरी झाडे लावणे टाळा.
वास्तूनुसार, तुळशीजवळ काटेरी झाडे ठेवू नयेत, कारण यामुळे घरात गरिबी येते आणि घरातील सदस्यांमध्येच संघर्ष निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला गुलाबाचे रोप ठेवायचे असेल तर ते तुळशीपासून दूर ठेवा, कारण गुलाबाचे रोप देखील काटेरी असते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











