बेरोजगारी ही आपल्या भारतातील सर्वात मोठी समस्या आहे. अनेक मुले मुली उच्चशिक्षित असूनही बेरोजगार आहेत. बेरोजगारीचा आकडा हात दिवसेंदिवस वाढत चाललंय. एकीकडे हाताला काम नाही आणि दुसरीकडे देशातील महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारीमुळे अनेक तरुण निराशात आहेत. आपल्या भविष्याच्या चिंतेत आहेत. आता आपलं पुढे कसं होणार अशी समस्या त्यांना भेडसावतेय. तुमचे बाबतीत असंच काहीसं असेल तर चिंता करू नका आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय (Upay For Job) सांगणार आहोत जे करताच अवघ्या 15 दिवसात तुम्ही नोकरीला लागाल.
1) दररोज सूर्याला जल अर्पण करा
सूर्य हा आत्म्याचा आणि करिअरचा कारक आहे. अशावेळी नोकरी मिळवण्यासाठी सूर्य देवाला शरण जाणे गरजेचे आहे. त्यासाठी सूर्योदयाच्या वेळी, तांब्याच्या भांड्यात पाणी घ्या आणि “ओम घृणी सूर्याय नम:” या मंत्राचा ११ वेळा जप करा आणि सूर्याला अर्पण करा. त्यानंतर, “ओम ह्रीम सूर्याय नम:” हा ७ वेळा जप करताना पाणी अर्पण करा.

2) हनुमानजीची पूजा सुरू करा (Upay For Job)
लवकरात लवकर नोकरी मिळण्यासाठी दररोज हनुमान मंदिरात जा किंवा घरी हनुमानजीच्या मूर्तीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर, 7 वेळा हनुमान चालीसा पठण करा आणि त्यांच्यासमोर बसून “सीता राम” या नावाचा १०८ वेळा जप करा. तुमच्या आयुष्यातील अडचणी लवकरात लवकर संपू दे अशी विनंती हनुमानाला करा.
3) गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करा
गुरू हा ज्ञान आणि समृद्धीचा कारक आहे. गुरुवारी सकाळी अंघोळ केल्यानंतर, केळीच्या झाडावर पाणी घाला, हळदीचा टिळा लावा आणि ५ ग्रॅम डाळ अर्पण करा. त्यानंतर, केळी, बेसन मिठाई किंवा पिवळा कापड यासारखी पिवळी वस्तू गरिबांना दान करा. “ओम ब्रिम बृहस्पतेय नम:” हा मंत्र २१ वेळा जप करा. गुरुच्या आशीर्वादाने, लवकरात लवकर तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता असते. (Upay For Job)
4) बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा
बुध हा बुद्धिमत्ता आणि संवादाचा कारक आहे. बुधवारी, भगवान गणेशाला २१ दुर्वा अर्पण करा आणि “ओम एकादंतये विद्महे, वक्रतुंडये धीमहि, तन्नो दंतिह प्रचोदयात्” या मंत्राचा १०८ वेळा जप करा. त्यानंतर, गरजू व्यक्तीला हिरवा रुमाल किंवा पेन दान करा.
5) शिवलिंगाला दूध अर्पण करा
भगवान शंकर म्हणजे जीवनातील सर्व अडचणी आणि अडथळे दूर करणारा देवांचा देव. त्यामुळे नोकरी मिळवण्यासाठी शंकराला शरण जाणेही गरजेच आहे. यासाठी दररोज शिवलिंगाला दूध अर्पण करा आणि “ओम नमः शिवाय” या मंत्राचा २१ वेळा जप करा. मला लवकरात लवकर चांगली नोकरी लागू दे अशी प्रार्थना करा. लवकरच तुम्हाला यश मिळेल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











