Vastu Tips : घराच्या या दिशेला चुकूनही झाडे लावू नका; अन्यथा मोठा वास्तुदोष निर्माण होईल

Asavari Khedekar Burumbadkar

आपल्या भारतात वास्तुशास्त्राला (Vastu Tips) मोठ महत्त्व आहे. घराची संपूर्ण रचना, स्वयंपाकघर, देवघर, शयनकक्ष हे योग्य दिशेला आहेत का याचा विचार करून रोज अनेक जण घर बांधतात. असं म्हणतात की घरात जर वास्तुदोष असते तर घरातील सदस्यांना अनेक अडचणींना सामोरे जाऊ लागू शकते. मित्रानो, आपल्यापैकी अनेकांच्या घरात लहान रोपे पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का?? रोपांची जागा सुद्धा वास्तुशास्त्रानुसारच असावी. अन्यथा मोठ्या आर्थिक अडचणी होऊ शकतात. अशावेळी ही लहान रोपे कोणत्या दिशेला असावी आणि कोणत्या दिशेला नसावी याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

खरं तर घरात रोपे लावण्याची परंपरा खूप आधीपासून आहे. याचे कारण म्हणजे ही झाडे केवळ पर्यावरण शुद्ध करत नाहीत तर घरात सकारात्मक ऊर्जा देखील आणतात. तुळशी, मनी प्लांट आणि बांबू सारख्या वनस्पतींना संपत्ती, सौभाग्य आणि आरोग्याचे प्रतीक मानले जाते. परंतु, जर या रोपांची दिशा चुकीची असेल तर मात्र अवघड होत.

या दिशांना रोपे लावणे अशुभ मानले जाते – Vastu Tips

दक्षिण दिशा

वास्तूनुसार, दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. या दिशेने झाडे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.ही दिशा जडपणा आणि स्थिरता दर्शवते, तर झाडे वाढ आणि विस्ताराचे प्रतीक आहेत, त्यामुळे दोघांमध्ये संघर्ष निर्माण होतो. Vastu Tips

पश्चिम दिशा

पश्चिम दिशा ही सूर्यास्ताची दिशा आहे. या दिशेने झाडे लावल्याने घरात आळस, थकवा आणि मानसिक ताण वाढू शकतो.

ईशान्य दिशा

हा कोपरा देव आणि जल तत्वाचे क्षेत्र मानला जातो. येथे जड वस्तू किंवा मोठी झाडे ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात. ईशान्य कोपऱ्यात मोठी झाडे किंवा कुंड्या ठेवल्याने घरात शांती आणि आनंद भंग होतो आणि आर्थिक प्रगतीला बाधा येते.

कोणत्या दिशेला झाडे लावावी

उत्तर दिशा

उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. येथे मनी प्लांट, तुळस, फर्न किंवा इतर हिरवीगार झाडे लावल्याने संपत्ती आणि सौभाग्य वाढते.Vastu Tips

पूर्व दिशा

ही दिशा सौर उर्जेने भरलेली आहे. येथे रोपे लावल्याने घरात ताजेपणा, आरोग्य आणि समृद्धी टिकून राहते. सकाळचा सूर्यप्रकाश झाडे चैतन्यशील ठेवतो आणि ही दिशा मानसिक शांतीसाठी देखील चांगली मानली जाते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या