घराचा देव्हारा (Vastu Tips) अतिशय शुद्ध आणि पवित्र मानला जातो. देव्हाऱ्यातच आपण देवाच्या मूर्ती बसवतो आणि दररोज त्याची मनोभावे पूजा करतो. घराच्या देव्हाऱ्यातून सकारात्मक ऊर्जा होते आणि त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो.परंतु कधीकधी आपण कळत नकळतपणे देवरात अशा काही वस्तू ठेवतो ज्या वास्तु आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशुभ मानल्या जातात. वास्तुशास्त्रानुसार, घरातील मंदिरात काही विशिष्ट मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे जर तुम्हाला घरात सुख-शांती हवी असेल, तर अशा मूर्ती ठेवण्यापासून दूर राहावे. चला तर मग, जाणून घेऊया कोणत्या मूर्ती देवघरात ठेवू नयेत.
1) मृत नातेवाईकांचे फोटो किंवा मूर्ती
वास्तुशास्त्रानुसार , घरातील देवघरात आपल्या पूर्वजांचे कींवा मृत नातेवाइकांचे फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत. कारण यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता असते. मृत व्यक्तींची पूजा फक्त पितृपक्षातच करावी. मृत व्यक्तीची दररोज पूजा करत बसल्यास घरात तणाव, मानसिक अस्वस्थता आणि अडचणी वाढतात. तसेच आर्थिक संकटे सुद्धा वाढत जातात. याशिवाय संत किंवा साधूचे फोटो सुद्धा देवघरात ठेवू नये. कारण ती जागा फक्त देव देवतांसाठी असते.
2) उग्र देवतांच्या मूर्तीही ठेवू नयेत (Vastu Tips)
वास्तुनुसार घराच्या देवघरात काली माता, शनीदेव किंवा राहू-केतू यांच्या मूर्ती ठेवू नयेत. हे देव उग्र मानले जातात आणि त्यांची पूजा खास नियम आणि विधीने करावी लागते. समजा तुम्ही या देवांच्या मूर्ती देवघरात ठेवल्या आणि चुकीच्या पद्धतीने पूजा केली तर त्याचा उलट परिणाम तुमच्यावर होण्याची शक्यता असते. तुमच्या आयुष्यात आर्थिक संकटे, ताण तणाव येऊ शकतो. त्यामुळे घराच्या पूजाघरात नेहमी शांत आणि सौम्य स्वरूपाच्या देवतांच्या मूर्ती ठेवाव्यात. Vastu Tips
3) नृत्य करणारी गणेशमूर्ती
सर्वसामान्यपणे आपल्या सर्वांच्या देवघरात गणेशमूर्ती ही असतेच. गणपती बाप्पा तसेच तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीचा. परंतु गणपतीची मूर्ती ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात विशिष्ट नियम सांगितले आहेत. असे म्हटले जाते की नृत्य करणारी गणेशमूर्ती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसची बनलेली मूर्ती कधीही मंदिरात ठेवू नये. यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. घराच्या मंदिरात नेहमी बसलेली आणि आशीर्वाद देणारी गणेशमूर्ती ठेवणे शुभ मानले जाते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





