जेव्हा आपण आपल्या जन्माची पत्रिका बघतो तेव्हा अनेकांच्या कुंडलीत दोष असल्याची आढळते. कुंडलीतील दोष म्हणजे प्रगतीमध्ये अडथळा. मग ती नोकरीमध्ये असेल किंवा शिक्षणामध्ये अनेकदा तर कुंडली दोषामुळे तरुणांचे लग्न सुद्धा ठरत नाहीत. कुंडली दोष दूर करण्यासाठी अनेकजण शांती करतात. परंतु शांती करूनही अनेकांना म्हणावा तसा फरक पडत नाही. आजकाल अनेकांची तर लग्न सुद्धा होत नाहीत. तुमच्या बाबतीत सुद्धा अस काही असेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा एका मंदिराबद्दल सांगणार आहोत, जिथे माता टिकतात तुमच्या आयुष्यातील सर्व प्रॉब्लेम एका झटक्यात सुटू शकतात.
कुठे आहे मंदिर
आम्ही तुम्हाला ज्या मंदिराबद्दल सांगतोय ते मंदिर आहे तमिळनाडूमध्ये. नित्य कल्याण पेरुमल मंदिर असे या मंदिराचे नाव असून हे मंदिर भगवान विष्णूच्या वराह अवताराला समर्पित आहे. नित्य कल्याण पेरुमल (भगवान विष्णूचा वराह अवतार) आणि त्यांची पत्नी लक्ष्मी (कोमलवल्ली थायर) देखील येथे उपस्थित आहेत हे उल्लेखनीय आहे. या मंदिरात येणारे भाविक केवळ मंदिराला भेट देत नाहीत तर त्यांच्या लग्नाचा मार्गही दूर होतो.

3 महिन्यांत लग्न ठरत?
भारतात अनेक मंदिरे असली तरी, नित्य कल्याण पेरुमल मंदिराचे वेगळेपण लग्नाच्या समर्पणात आहे. होय, तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल परंतु या मंदिराचे खास ख्याती म्हणजे जर एखाद्याचं लग्न ठरत नसेल आणि त्या व्यक्तीने या मंदिरात जाऊन माता टेकला, तर अवघ्या तीन महिन्यात सदर व्यक्तीचे लग्न जमतं असं बोललं जातं. म्हणजेच काय तर ज्यांना लग्नाच्या बाबतीत अडचण येत आहेत किंवा लग्न ठरत नाही अशा लोकांसाठी या मंदिरात गेल्यानंतर फक्त तीन महिन्यातच लग्नाचे दरवाजे उघडतात.
या मंदिराला भेट देण्याचा अनुभव केवळ दर्शनापुरता मर्यादित नाही. भेट दिल्यानंतर लोकांना वाटते की त्यांचा मानसिक ताण कमी होतो आणि लग्नाचा मार्ग सोपा होतो. केवळ धार्मिक श्रद्धाच नाही तर पर्यटकांनी केलेल्या कथा आणि अर्पणांमुळे ते इतके चमत्कारिक बनते.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











