गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना खरंतर समोर आली आहे. गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्रापासून 14 किमी अंतरावर असलेल्या दांता तालुक्यातील पडलिया गावात 500 जणांनी वन विभाग आणि पोलिस पथकावर हल्ला केला. या धक्कादायक घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
500 लोकांच्या जमावाचा थेट पोलिसांवर हल्ला
गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्रापासून 14 किमी अंतरावर असलेल्या दांता तालुक्यातील पडलिया गावात 500 जणांनी वन विभाग आणि पोलिस पथकावर हल्ला केला. दगडफेक, गोफणी आणि धनुष्य बाणाने हल्ला करत पोलिस कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले. जमावाने पोलिस आणि वन विभागाच्या सरकारी वाहनांनाही आग लावली. या घटनेत पोलिस, वन आणि महसूल विभागातील 47 अधिकारी जखमी झाले. जखमींपैकी 36 जणांना अंबाजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, तर 11 जणांना पालनपूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. तथापि, हल्ल्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी सांगितले की, दुपारी 2:30 च्या सुमारास पोलिस, वन आणि महसूल अधिकाऱ्यांचे संयुक्त पथक वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक 9 परिसरात रोपवाटिका आणि वृक्षारोपण करत असताना ही घटना घडली. पडलिया गावात वन विभागाच्या सर्व्हे क्रमांक 9 क्षेत्रावरून बराच काळ वाद सुरू असल्याचा दावा केला जात आहे. जेव्हा पथक झाडे लावण्यासाठी आले तेव्हा हल्ल्याची तयारी करणाऱ्या लोकांच्या एका गटाने त्यांच्यावर हल्ला केला. तथापि, हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.





