अंकिता भंडारी प्रकरणात न्यायालयाचा मोठा निकाल; अवघ्या देशाला हादरवून टाकणारं प्रकरण नेमकं काय?

Rohit Shinde

 उत्तराखंडमधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणात कोटद्वारच्या दिवाणी न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. न्यायालयाने मुख्य आरोपी पुलकित आर्य, सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा खटला २०२० मधील होता. सुमारे दोन वर्षे आणि आठ महिने न्यायालयात खटला चालला. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की तिन्ही आरोपींनी मिळून अंकिताची हत्या केली आणि तिचा मृतदेह लपवण्याचा कट रचला. शिक्षा सुनावल्यानंतर, तिन्ही आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.

अंकिता भंडारी प्रकरण काय?

अंकिता भंडारी हत्याकांड उत्तराखंडमधील एक धक्कादायक आणि चर्चेचा विषय ठरलेला प्रकरण आहे. १९ वर्षीय अंकिता भंडारी ही ऋषिकेशमधील वनंतरा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. १८ सप्टेंबर २०२२ रोजी ती बेपत्ता झाली होती, आणि २४ सप्टेंबर रोजी तिचा मृतदेह चिला कालव्यात सापडला. शवविच्छेदन अहवालानुसार, अंकिताच्या शरीरावर ब्लंट ऑब्जेक्टमुळे झालेल्या जखमा आढळल्या, ज्यामुळे तिच्यावर शारीरिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. तिच्या मित्राशी झालेल्या संवादातून समोर आले की, रिसॉर्टमधील उच्चभ्रू पाहुण्यांना सेवा देण्यासाठी अंकिता वर दबाव टाकला जात होता, ज्याला तिने विरोध केला. तिच्या व्हॉट्सअ‍ॅप संदेशात तिने स्पष्टपणे सांगितले की, “मी गरीब असले तरी स्वत:ला १० हजारांसाठी विकणार नाही”

कट रचत अंकिताची हत्या 

त्यानंतर या प्रकरणातील आरोपी मुख्य आरोपी पुलकित आर्य (भा.ज.पा. नेते विनोद आर्य यांचा मुलगा), सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांनी कट रचत अंकिताची हत्या केली, या प्रकरणात मुख्य आरोपी पुलकित आर्य (भा.ज.पा. नेते विनोद आर्य यांचा मुलगा), सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने आता २०२५ मध्ये या तिघांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपींनी कट रचत अंकिता भंडारीची हत्या केल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती, आणि न्यायासाठी मोठे जनआंदोलन झाले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला काही प्रमाणात न्याय मिळाला आहे.

ताज्या बातम्या