Mumbai – मुंबईकरांची जीवनवाहिनी अशी ओळख असलेले मुंबईची लोकल ट्रेन, या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. मुंबईची लोकल ट्रेन ही मुंबईकरांच्या प्रवाशांचे मुख्य साधन आहे. लोकल ट्रेनमध्ये दिवसागणिक मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते, त्यामुळं रेल्वेनं लोकल ट्रेन वाढवाव्यात अशी मागणी रेल्वे प्रवाशांकडून होत असताना आता लोकल ट्रेनने प्रवास करतात अशा मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईची लोकल ट्रेनबाबत महत्वाची व मोठा बातमी समोर येत आहे. मुंबईत लवकरच म्हणजे डिसेंबरअखेर पहिली स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.
स्वयंचलित दरवाजांचे फायदे काय?
– रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाद्वारे गाड्यांना स्वयंचलित दरवाजे बसवले जाणार
– बंद-दरवाजांच्या डिझाइनच्या माध्यमातून नवीन नॉन-एसी ट्रेन तयार करणार
– गर्दीच्या वेळी बंद दरवाजे अपघात रोखू शकतात
– सध्या १२ आणि १५ डब्यांच्या गाड्या पण भविष्यात १८ डब्यांच्या लोकलवर भर देणार
– एसी लोकल ट्रेन नैसर्गिकरीत्या बंद-दरवाजांच्या असतील

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून निर्णय…
दरम्यान, मुंबईत वाढत जाणारी लोकसंख्या आणि त्यातच रेल्वे प्रवाशीही वाढताहेत. त्यामुळं सकाळी आणि सांयकाळी रेल्वेवर गर्दीचा ताण दिसून येतो. रेल्वे प्रवाशांच्या गर्दीमुळं प्रत्येक वर्षी रेल्वे डब्यातून पडून अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो. मृत्युमुखींची संख्या वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित दरवाजांची नॉन-एसी लोकल यावर्षी डिसेंबरअखेर धावणार आहे. तसेच मुंब्रा रेल्वे स्थानक येथे झालेल्या अपघातानंतर स्वयंचलित नॉन एसी लोकलच्या निर्णयाला अधिक गती मिळाली आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे. शनिवारी बुलेट ट्रेनच्या घणसोली येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
घनसोली आणि शिळफाटा 5 किमी बोगदा पूर्ण
दुसरीकडे मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी घनसोली आणि शिळफाटा 5 किमी बोगदा पूर्ण करण्यात आला आहे. हा गदा सुमारे 5 किमी (4.881 किमी) लांबीचा असून, बीकेसी आणि शिळफाटा दरम्यान 21 किमीच्या समुद्राखालील बोगद्याचा काही भाग आहे, ज्यामध्ये ठाणे खाडीच्या खाली 7 किमी मार्गाचा समावेश आहे. या बोगद्याचे काम गेल्या वर्षी मे महिन्यात सुरु झाले होते. बोगद्याची अंतर्गत खोदकाम रुंदी १२.६ मीटर आहे. दरम्यान, देशातील पहिला 508 कि.मी लांब बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे. यात 17 नदी पूल आणि 09 स्टील पूल पूर्ण झालेत.











