MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी बेस्ट आहेत ५ आयुर्वेदिक ड्रिंक्स, पण कधी आणि कसं प्यायचं जाणून घ्या

थायरॉईडमुळे अनेकांना विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे ५ आयुर्वेदिक ड्रिंक या समस्यांपासून आराम देऊ शकतात.
थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी बेस्ट आहेत ५ आयुर्वेदिक ड्रिंक्स, पण कधी आणि कसं प्यायचं जाणून घ्या

Ayurvedic remedies for thyroid:   थायरॉईड ही एक सामान्य समस्या बनली आहे. आजकाल बिघडलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि ताणतणाव यामुळे अनेकांना थायरॉईडची समस्या निर्माण होत आहे. थारॉईड ही आपल्या घशाजवळ असणारी एक फुलपाखरूच्या आकाराची ग्रंथी आहे. ही ग्रंथी शरीरातील मेटाबॉलिजम नियंत्रित करते.

पण जेव्हा या ग्रंथीमध्ये बिघाड होतो तेव्हा शरीरात विविध समस्या निर्माण होतात. यामुळे वजन वाढणे किंवा कमी होणे, केस गळणे, चेहऱ्यावर केस येणे, मासिक पाळी अनियमित होणे असे अनेक लक्षणे दिसून येतात. अनेकजण थारॉईड नियंत्रित करण्यासाठी विविध प्रकारची औषधे घेतात. परंतु काही घरगुती ड्रिंक्सचा मदतीने थायरॉईड नियंत्रित करता येते. चला जाणून घेऊया या पेयांबद्दल…

 

धण्याचे पाणी-

थायरॉईडमध्ये तुम्ही दररोज धण्याचे पाणी सेवन करू शकता. यामुळे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत मिळेल. यामध्ये तुम्ही दररोज धणे घेऊन एक ग्लास पाण्यात उकळवा, नंतर ते पाणी पिऊन टाका. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. शिवाय थायरॉईड नियंत्रित राहण्यासही मदत होईल.

 

लिंबू आणि मधाचे पाणी-

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी तुम्ही लिंबू पाणी पिऊ शकता. खरं तर लिंबू पाणी हे नैसर्गिक डिटॉक्स ड्रिंक आहे. यामुळे शरीरातील घाण बाहेर टाकली जाते. शिवाय वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण थायरॉईडमध्ये वजन कमी करणे आवश्यक असते. अशावेळी तुम्ही एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून त्यात काही थेंब मध घालून त्याचे सेवन करू शकता. रोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी पिणे उत्तम असते.

 

हिरव्या पालेभाज्यांचा रस-

अनेकांना हायपरथायरॉईडची समस्या होते. अशावेळी तुम्ही आपला आहारात हिरव्या पालेभाज्यांचा रस समाविष्ट करू शकता. यामुळे थायरॉईड नियंत्रित होण्यास मदत मिळेल. तसेच त्याचे शरीराला इतरही अनेक फायदे मिळतील. परंतु थायरॉईडमध्ये फळांचा रस पिणे टाळावे. फक्त कारले, दुधी भोपळा, कवाळ यांचा रस पिणे योग्य आहे.

 

आल्याचे पाणी-

आले आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. थायरॉईड असणाऱ्यांनी एक ग्लास पाणी घेऊन त्यात आल्याचा तुकडा टाकून ते पाणी चांगले उकळून घ्यावे. आता ते पाणी पिऊन टाकावे. आल्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते, वजन कमी होण्यास मदत होते. शिवाय सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मेटाबॉलिज्म चांगल्या प्रकारे काम करते. त्यामुळे थायरॉईड नियंत्रित राहण्यास मदत होते.

 

 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)