Namo Shetkari Samman Yojana – शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत खात्यात हफ्ता जमा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पंतप्रधानानी शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून दर चार महिन्यातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जातात. दरम्यान, आता राज्य सरकार देखील केंद्र सरकारप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत.
91 लाख 64 हजार 957 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा
दरम्यान, केंद्र सरकारने नुकताच 20 वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. केंद्र सरकारचे 6 हजार आणि राज्य सरकारचे 6 हजार मिळून शेतकऱ्यांना 12 हजार रुपये मिळतात. दरम्यान, आज नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. 91 लाख 64 हजार 9157 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. यासाठी राज्य सरकारने 1892 कोटी 61 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. या पैशांची नक्कीच मदत शेतकऱ्यांना होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
आगे आगे देखो होता है क्या…
दुसरीकडे आज उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे, यासाठी क्रॉस वोटिंग होईल असं इंडिया आघाडीने म्हटले आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होईल, असं म्हटलं जात आहे, असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, विरोधकांनी निश्चितच स्वप्न पहावी, पण आगे आगे देखो… होता है क्या… असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. तसेच सोलापूरमधील माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन प्रकरणातील मी रिपोर्ट मागितला आहे, त्यानंतर त्यावर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.





