MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

PM Kisan Yojana : PM किसान योजनेत आता 12000 रुपये मिळणार? संसदेतून मोठी अपडेट

मात्र मागील काही दिवसापासून केंद्र सरकार या योजनेची वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 12000 रुपये करणार असल्याची चर्चा रंगली होती. डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये देण्याची शिफारस केली होती.

PM Kisan Yojana : देशातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. या योजेनच्या माध्यमातून दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकार कडून ६००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते, हे पैसे थेट शेतकऱ्याचा बँक खात्यात जमा होतात. मात्र मागील काही दिवसापासून केंद्र सरकार या योजनेची वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 12000 रुपये करणार असल्याची चर्चा रंगली होती. डिसेंबर 2024 मध्ये संसदीय स्थायी समितीने शेतकऱ्यांना वार्षिक 12000 रुपये देण्याची शिफारस केली होती. मात्र संसदेत अशा प्रकारचा कोणताही विचार सरकारच्या मनात नसल्याचे कृषी राज्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे शेतकऱ्याचा चांगलाच हिरमोड झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

संसदीय स्थायी समितीच्या शिफारशीबाबत खासदार समीरुल इस्लाम यांनी राज्यसभेत आवाज उठवला आणि सरकारकडून पीएम किसान योजेनच्या (PM Kisan Yojana) दुप्पट रकमेबाबत नेमकं उत्तर काय असेल याची मागणी केली. यावर उत्तर देताना कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. ठाकूर यांनी म्हटले की, ‘सरकार अशा प्रस्तावावर विचार करत नाही.’ याचाच अर्थ सध्या सरकार पीएम किसान रक्कम दुप्पट करणार नाही. त्यामुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ६००० रुपयांऐवजी १२००० रुपये मिळणार नाहीत हे निश्चित झाल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता वाढीव निधीसाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. PM Kisan Yojana

आत्तापर्यंत २१ हप्ते मिळाले – PM Kisan Yojana

पंतप्रधान किसान सन्मान निधी ही शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी 2019 साली सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. फक्त अल्पभूधारक म्हणजेच ज्याला कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे २१ हप्ते शेतकऱ्यांना मिळालेले असून आता २२ व्या हप्त्याची प्रतीक्षा बळीराजाला आहे.