आदिवासी विभागाचा निधी वळवूनही लाडकी बहिणचे पैसे अडले कुठे? कधी मिळेल मे महिन्याचा हप्ता?

लाडकी बहिण योजनेसाठी आदिवासी विभागाचा 350 कोटींचा निधी वळविण्यात आला, तरी महिलांना अद्याप या योजनेचा मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही, नेमका उशिरं का होतोय? कधी मिळतील पैसे? जाणून घेऊ...

लाडकी बहिण योजनेच्या मे महिन्याच्या रक्कमेची प्रतीक्षा महिलांना लागून राहिली आहे. नेमके मे महिन्याचे पैसे मिळणार कधी असा सवाल सातत्याने उपस्थित केला जात आहे. अलीकडे लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विकास विभागाचा ३३५ कोटींचा निधी वळविण्यात आला आहे. या निर्णयामुळे आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. याआधी सामाजिक न्याय विभागाचा निधी या योजनेसाठी वळविण्यात आला होता. आदिवासी मंत्र्यांनी सांगितले की, आदिवासी विभागाची कोणतीही योजना बंद पडणार नाही. असं असताना अद्याप महिलांना पैसे मिळालेले नाहीत.

मे महिन्याचे पैसे येणार कधी?

याबाबत आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महत्वाचं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी त्यांनी 3.37 कोटींच्या फाइलवर स्वाक्षरी केली आहे. यामुळे लवकरच पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यांनी पुढे सांगितले की, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होताच हप्त्याची रक्कम तातडीने वितरित केली जाईल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे लवकरच याबाबत अधिकृत माहिती जाहीर करतील.

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंतचे बहुतांश हप्ते हे महिन्याच्या शेवटी 25 ते 30 तारखेपर्यंत जमा झाले आहेत. या वस्तुस्थितीचा विचार करता  मे महिन्याचा हप्ता देखील महिनाअखेर पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. मे महिना संपण्यास आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. याबाबत अंतिम तारीख आणि अधिक माहिती लवकरच जाहीर होईल.

अनेक महिलांना योजनेतून वगळलं

लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्जांची पडताळणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. काहींनी बनावट कागदपत्रांचा वापर करून योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. तसेच, काही प्रकरणांमध्ये पुरुषांच्या नावाने बँक खाती उघडून फसवणूक झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे अशा अपात्र आणि फसवणूक करणाऱ्या अर्जदारांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत. अशा महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही. त्यामुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे लाभ मिळवणाऱ्या महिलांना यामुळे दणका बसणार आहे.

About Author

Rohit Shinde

Other Latest News