MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

मुंबईत लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; प्रवाशांची डोकेदुखी वाढणार!

Written by:Rohit Shinde
आज 03 ऑगस्ट, रविवार मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तिन्ही मार्गांवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.
मुंबईत लोकल रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक; प्रवाशांची डोकेदुखी वाढणार!
आज 03 ऑगस्ट, रविवार मुंबई उपनगरी रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी काही गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. प्रवाशांनी प्रवासाच्या आधी वेळापत्रक तपासावे. पर्यायी प्रवासाची व्यवस्था करूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, प्रवाशांना मनस्ताप

मुंबईतील मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर देखभाल आणि अभियांत्रिकी कामांसाठी येत्या रविवारी, 3 ऑगस्ट 2025 रोजी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवास करावा.

मध्य रेल्वेवरील ब्लॉक

माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 या वेळेत मेगाब्लॉक राहील. या काळात जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर वळवण्यात येतील, त्यामुळे काही लोकल १५ मिनिटांपर्यंत उशिराने धावण्याची शक्यता आहे.

हार्बर रेल्वे ब्लॉक

कुर्ला ते वाशी या दरम्यान अप-डाऊन मार्गावर 11.10 ते 4.10 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉकच्या काळात कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहणार आहे. यावेळी सीएसएमटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल या दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवण्यात येणार आहेत. प्रवाशांना पर्यायी मार्ग म्हणून ठाणे ते वाशी-नेरुळ ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करता येईल.

पश्चिम रेल्वे ब्लॉक

चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर 10.35 ते 3.35 या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाईल. या कालावधीत जलद मार्गावरील काही लोकल सेवा रद्द करण्यात येणार असून, काही लोकल फक्त बांद्रा किंवा दादरपर्यंत धावतील आणि तेथूनच परतीच्या दिशेने मार्गस्थ होतील. ब्लॉकदरम्यान सर्व जलद लोकल गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.

प्रवास करताना वेळापत्रक पाहा!

खरंतर रविवारच्या मेगाब्लॉकच्या दिवशी मुंबईकर प्रवाशांची डोकेदुखी चांगलीच वाढत असते. अशावेळी उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक असल्याने अधिकचा मनस्ताप होणार आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.