Pune Ganesha Immersion Procession : पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची नियमावली आणि वेळ जाहीर!

पुण्यात दरवर्षी विसर्जनाची मोठी धूम असते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. याबाबतची नियमावली पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे.

Pune Ganesha Immersion Procession Preparations :  बाप्पााच्या परतीची वेळ आता जवळ आली आहे. शनिवारी ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी गणेशाचं विसर्जन होईल. पुण्यात दरवर्षी विसर्जनाची मोठी धूम असते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने लोक सहभागी होतात. याबाबतची नियमावली पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आली आहे. मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पुण्यातील मानाचे गणपती आणि मिरवणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

पुण्यातील मानाचे गणपती आणि मिरवणुकीचं वेळापत्रक

  • सकाळी 9:15 वाजता: पहिला मानाचा कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळ्यासमोर पोहोचेल.
  • सकाळी 9:30 वाजता: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात होईल आणि हा गणपती बेलबाग चौकात पोहोचेल.
  • सकाळी 10:15 वाजता: कसबा गणपती लक्ष्मी रोडकडे प्रस्थान करेल.
  • सकाळी 10:30 वाजता: दुसरा मानाचा गणपती (तांबडी जोगेश्वरी) बेलबाग चौकातून लक्ष्मी रोडकडे जाईल.
  • दुपारी 1:00 वाजता: सहावा (महापालिका गणपती) आणि सातवा (त्वेष्ट कासार गणपती) मंडळ मिरवणुकीत सामील होतील.
  • दुपारी 3:45 वाजता: लक्ष्मी रोड आणि शिवाजी रोडवरील मंडळे मुख्य मिरवणुकीत सामील होतील.
  • दुपारी 4:00 वाजता: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत सामील होईल.
  • संध्याकाळी 5:30 नंतर: जिलब्या मारुती आणि अखिल मंडई गणपती मंडळे मिरवणुकीत सामील होतील.

महत्त्वाचे नियम

मिरवणुकीदरम्यान मोठी गर्दी होते. अतिरेकी गर्दी झाली तर त्यावर नियंत्रण आणणं कठीण होतं. यासाठी पुणे पोलिसांकडून आधीच याबाबतची नियमावली देण्यात आली आहे.

– प्रत्येक मंडळाला एक डीजे किंवा एक ढोल-ताशा पथक ठेवण्याची परवानगी
– प्रत्येक ढोल-ताशा पथकात कमाल ६० सदस्य
– कसबा गणपती अलका टॉकीज चौकाजवळ पोहोचेपर्यंत इतर मंडळांनी तिथं थांबू नये.
– टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवरील मिरवणुका सकाळी १०.३० पूर्वी सुरू होणार नाहीत
– टिळक पुतळा ते बेलगाव चौकात ढोल-ताशा किंवा डीजे वाजविण्यास मनाई
– गणेश मंळडांनी मिरवणुकीदरम्यान शिस्त पाळावी, रेषा तोडू नये.

 

 


About Author

Smita Gangurde

Other Latest News