MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार; वेळापत्रक, स्टेशन्स आणि तिकिटाचा दर काय?

Written by:Rohit Shinde
आता 26 ऑगस्टपासून ही ट्रेन नांदेडपर्यंत धावेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांना मोठा फायदा मिळेल. प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाचे खऱ्या अर्थाने स्वागत होताना दिसत आहे.
मुंबई-जालना वंदे भारत एक्स्प्रेस आता नांदेडपर्यंत धावणार; वेळापत्रक, स्टेशन्स आणि तिकिटाचा दर काय?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा विस्तार हजूर साहिब नांदेडपर्यंत करण्यात आला असून विस्तारित गाडीचे उद्घाटन 26 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात येणार आहे. या करिता एक उद्घाटन विशेष गाडी 26 ऑगस्ट ला चालविण्यात येईल. आधी ही हाय स्पीड ट्रेन आठवड्यातील सहा दिवस (बुधवार वगळता) जालना ते मुंबईदरम्यान धावत होती. मात्र आता 26 ऑगस्टपासून ही ट्रेन नांदेडपर्यंत धावेल. रेल्वेच्या या निर्णयामुळे परभणी आणि नांदेडच्या प्रवाशांना मोठा फायदा मिळेल. प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाचे खऱ्या अर्थाने स्वागत होताना दिसत आहे.

मुंबई-नांदेड गाडीचे वेळापत्रक नेमके कसे?

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) पासून ही ट्रेन दुपारी 1.10 वाजता रवाना होईल आणि रात्री 10.50 वाजता नांदेडला पोहोचेल. मंगळवारी लोकार्पण झाल्यानंतर गुरुवारपासून ही ट्रेन दररोज सकाळी 5 वाजता एच.एस. नांदेड रेल्वे स्थानकावरुन सुटेल आणि दुपारी 2.25 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या वंदे भारतमुळे नांदेड ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास सव्वा तीन तासात पूर्ण होईल. यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांना जलद आणि आरामदायक, आधुनिक रेल्वे यात्रेची सुविधा मिळेल. तर नांदेड परतीचा प्रवास पहाटे 5 वाजता सुरू होईल.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,दादर,ठाणे,कल्याण,नाशिक रोड,मनमाड,औरंगाबाद,जालना,परभणी, नांदेड ही प्रमुख स्थानके या मार्गावर असणार आहेत.

तिकिटांचे दर नेमके कसे असणार?

CSTM ते नांदेडपर्यंत एसी चेअर कारचं तिकीट – 1,750 रुपये, तर एक्जिक्यूटिव्ह चेअर कारसाठी प्रवाशांना 3,300 रुपये मोजावे लागतील. रेल्वेने मराठवाड्यात सुरू केलेल्या वंदे भारत एक्सप्रेसमुळे पश्चिम महाराष्ट्रापासून मराठवाड्यापर्यंत जोडला जाईल. मुंबई-नांदेड वंदे भारत ट्रेन सेवा विशेषत: परभमी आणि नांदेडच्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल. आतापर्यंत ते या आधुनिक आणि जलद रेल्वे सेवेपासून वंचित होते.

ही गाडी हजूर साहिब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई हे अंतर 09 तास 25 मिनिटांत पूर्ण करेल. ज्यात एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार मिळून एकूण 20 डब्बे असतील. जालना ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वंदे भारत एक्स्प्रेस मध्ये 8 डब्बे होते. त्यात वाढ करून 20 डब्बे करण्यात आले आहेत. खरंतर याबाबत नांदेड रेल्वे प्रशासनाकडून आधीच घोषणा करण्यात आलेली होती.