MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

एक संवैधानिक तोडगा काढू शकलो, जो कोर्टातही टिकेल, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Written by:Astha Sutar
या सगळ्यामध्ये मुंबईकरांना थोडा त्रास सहन करावा लागला. त्यासंदर्भात मुंबईकरांचे दिलगिरी देखील व्यक्त करतो. की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला, पण शेवटी एक चांगला निर्णय झाला, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
एक संवैधानिक तोडगा काढू शकलो, जो कोर्टातही टिकेल, मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis – गेल्या पाच दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत मनोज जरांगे-पाटील हे आंदोलन करत होते. आज आंदोलनाचा पाचवा दिवस होता. आज अखेर पाचव्या दिवशी आंदोलन संपले असून, पाचव्या दिवशी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला यश आले आहे. यानंतर राजकीय प्रतिक्रिया येत असून, आता मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया आली आहे. हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती. पण त्यातला महत्त्वाचा विषय होता की त्या ठिकाणी मनोज जरांगे-पाटील यांची मागणी होती. सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या. हायकोर्टाची व सुप्रीम कोर्टाचे निर्णय बघता अशा प्रकारे सरसकट करणे शक्य नव्हतं.

आणि वस्तुस्थिती लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली. मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जी काही त्यांची टीम होते त्यांना हे लक्षात आणून दिलं की, आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं. ते व्यक्तीला मिळत असतं. आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं. आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही, ते कायद्याच्या पाठीवर टिकणार नाही. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपसमिती व मंत्र्यांचे मनापासून अभिनंदन

दरम्यान, कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की, त्यातला हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेटमेंट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भात चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या. त्याचा जीआर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले. आणि तो जीआर देखील इश्यू झालेला आहे. त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागणी होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केले. पहिल्यांदा तर मला राधाकृष्ण विखे-पाटील आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत. त्या सर्वांचे आमच्या मंत्र्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो

आता मराठा आरक्षणाचा मार्ग निघाल्यामुळे जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत, यांचा कधीकाळी त्यांच्या रक्त नात्यातल्या कोणाचाही म्हणून उल्लेख झाला असेल, तर त्यांना आपल्याला नियमाने त्यासाठी आणि हैदराबाद अशा प्रकारची नोंदणी शोधणं सोपे होणार आहे. आणि त्यातलं फॅमिली करून अशा प्रकारचा आरक्षण देता येणार आहे. एकीकडे त्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते आरक्षण मिळेल. दुसरीकडे एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत. ते कसा तोडगा काढू शकलो की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातला लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की, मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

कधी शिव्या मिळतात, कधी फुलांचे हार मिळतात

राजकारणामध्ये टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचा स्वागत देखील करतात. जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही. कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकांसमोर येणार नाहीत, दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही. दोन समाजामध्ये याला दिला म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही, अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल, कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून यासंदर्भात जे जे काही कायदेशीर आहे. त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे.

मराठा समाज असो, ओबीसी समाज असो की महाराष्ट्रातल्या कुठल्याही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं, हे माझं मी कर्तव्य समजतो. त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे  हार मिळतात, असं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.