दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे बुधवारी झालेल्या जीएसटी काउन्सिलच्या मॅरेथॉन बैठकीत कर प्रणालीत मोठा बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल 10 तासांपेक्षा जास्त चाललेल्या या बैठकीत 12 टक्के आणि 28 टक्केचे स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या करप्रणालीमुळे देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या निर्णयामुळे व्यापारी तसेच सामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
5% आणि 18 % दोन जीएसटी स्लॅब
आता केवळ 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच जीएसटीचे स्लॅब असणार आहेत. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणांसह घरंही स्वस्त होणार आहेत. येत्या 22 सप्टेंबरपासून हा निर्णय लागू होणार आहे. 12 टक्के आणि 28 टक्केचे स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. नव्या नियमानुसार आता 5 टक्के आणि 18 टक्के असे फक्त दोनच स्लॅब राहणार आहेत. जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून, यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारने 12% आणि 28% चे जीएसटी स्लॅब रद्द करून, त्याऐवजी 5% आणि 18% असे दोनच स्लॅब ठेवले आहेत. या ऐतिहासिक निर्णयाला सर्व राज्यांनी सहमती दिली असून, त्यामुळे महागाई कमी होण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
नव्या निर्णयामुळे नेमकं काय स्वस्त?
सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, साबण, कपडे, पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत. तर आरोग्य विमा आणि जीवन विम्यात पूर्ण सूट मिळण्याची शक्यता आहेत. सरकारचा हा निर्णय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
आरोग्य विमा,पनीर,पराठा,परोटा,खाकरा, चपाती, तंदूर रोटी, दूध, पिझ्झा , 33 जीवनरक्षक औषधे, गंभीर आणि दुर्मिळ आजारांवरची औषधं,पेन्सिल, शार्पनर,, क्रेयॉन्स , खोडरबर, वह्या, नकाशे, चार्ट, ग्लोब, इलेक्ट्रीक गाड्या, केसांचे तेल, शाम्पू, टूथपेस्ट, टूथ ब्रश, साबण, दाढीचे साबण , बटर, तूप, चीज, पाकिटातले नमकीन, भुजिया, मिक्श्चर, बाळाची दुधाची बाटली, डायपर, नॅपकिन्स , शिलाई मशिन आणि तिचे सुटे भाग , थर्मोमीटर, ग्लुकोमीटर आणि टेस्ट स्ट्रीप्स, चष्मे, रोगनिदानाची उपकरणे, ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचे टायर्स, सुटे भाग, जलसिंचन, तुषारसिंचनाची उपकरणे, कृषी उपकरणे, कृषी फवारणी औषधे…
थोडक्यात काय तर दैनंदिन जीवनाशी संबंधित गरजेच्या वस्तू, औषधे, कृषी साहित्य आणि उपकरणे स्वस्त होणार आहेत.
नेमक्या कोणत्या वस्तू महाग होणार?
लक्झरी वस्तू जसे की कार, बाईक आणखी महाग होतील. यावर एक विशेष स्लॅब लावला जाईल. याशिवाय तंबाखू, पान मसाला, फ्लेवर, फ्रूट ड्रिंक आणि इतर पॅकेज्ड पेये महाग होतील. 350 सीसी पेक्षा जास्त इंजिन असलेल्या बाईक महाग होतील. त्यामुळे तुम्ही महागड्या आणि चैनीच्या वस्तू खरेदी करण्याच्या विचार जर करत असाल तर त्यावर परिस्थितीनुरूप आणि वस्तूनुसार अधिकचा कर लावला जाणार आहे. काही वस्तूवरींल 40% पर्यंत असण्याची शक्यता देखील आहे.





