इस्लामाबाद- ऑपरेशन सिंदूरमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आणि देशात आणि जगात नाचक्की झाल्यानंतर आता पाकिस्तानी नेत्यांना पुन्हा तोंड फुटू लागलं आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी अमेरिकेत जाऊन मुक्ताफलं उधळल्यानंतर पाकिस्त्नानचे पंतप्रधान षहबाज शरीफ हेही या स्पर्धेत सहभागी झाले आहे. सिंधू जल कराराला स्थगिती देण्याच्या मुद्द्यावरुन त्यांनी भारताला पोकळ धमकी देण्याची भाषा केलीय.
शत्रूराष्ट्र म्हणजे भारत पाकिस्तानाचं एक थेंबही पाणी घेऊ शकत नाही, असं केल्याचा प्रयत्न जरी केला तरी आयुष्यभर लक्षात राहील असा धडा पाकिस्तान शिकवेल, अशी मुजोरीची आणि चीड आणणारी भाषा पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी केली आहे.
पाकच्या पंतप्रधानांची आणखी काय मुक्ताफळं?
भारतानं पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याला रोखण्याचा प्रयत्न केला तर ते सिंधू जल कराराचं उल्लंघन ठरेल, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ म्हणालेत. असं केल्यास
याचं उत्तर निर्णायक रुपात दिलं जाईल, अशी वल्गनाही शरीफ यांनी केली आहे. पाणी ही पाकिस्तानची जीवन रेखा आहे आणि आंतरराष्ट्रीय करारानुसार देशाच्या अधिकारांबाबत कुठेही मागे हटणार नाही, असंही शरीफ म्हणालेत.
बिलावल यांच्याकडून भारताला युद्धाची धमकी
पाक पंतप्रधान शरीफ यांच्यापूर्नी पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी भारताला युद्धाची धमकी दिली आहे. सोमवारी केलेल्या एका वक्तव्यात बिलावल यांनी म्हटलंय की, जर भारत सिंधू जल कराराला रद्द करत असेल तर पाकिस्ताकडे युद्धाशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही.
मोदी सरकारनं उचललेल्या काही पावलांमुळे पाकिस्तानचं मोठं नुसकान झालेलं आहे. आपल्याला एकत्र येत या आक्रमक धोरणांचं उत्तर द्यावं लागेल, असं भुट्टो यांनी सिंध प्रांताच्या एका कार्यक्रमात विधान केलंय. सहा नद्यांचं पाणी परत आणण्यासाठी पाकिस्तानातील जनता युद्धासाठी सक्षम आहे, असे अकलेचे तारेही त्यांनी तोडले आहेत.
48 तासांत 3 पाकिस्तानी नेत्यांच्या भारताला धमक्या
सिंधू जल करार स्थगितीवरुन गेल्या 48 तासांत 3 पाकिस्तानातील बड्या नेत्यांनी भारताला धमक्या देण्याचं कृत्य केलंय. यात लष्कर प्रमुख असीम मुनीर, पंतप्रधान शहबाज शरीफ आणि माजी परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांचा समावेश आहे.
भारतानं सिंधू नदीवर जर धरण बांधण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानं 10 मिसाईल्स डागून तो प्रयत्न हाणून पाडेल, अशी वल्गना लष्करप्रमुख मुनीर यांनी केली आहे. इतकंच नाही तर जामनगरमधील आशियातील सर्नात मोठ्या रिफायनरीवर हल्ला करण्याची वल्गनाही त्यांनी केलीय. या सगळ्या वक्तव्यांमुळे आगामी काळात भारत आणि पाकिस्तान संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.





