MP Breaking News
Mon, Dec 15, 2025

Dhurandhar Movie Box Office Collection : धुरंधर चा 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!कमाई 400 कोटींच्या उंबरठ्यावर

Sacnilk ने दिलेल्या अंदाजानुसार, ‘धुरंधर’ने दहाव्या दिवशी सुमारे 59 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून आतापर्यंतचा एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 351 ते 352 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्याचा ट्रेंड पाहता, येत्या काही दिवसांतच हा आकडा 400 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Dhurandhar Movie Box Office Collection : धुरंधर चा 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ!कमाई 400 कोटींच्या उंबरठ्यावर

Dhurandhar Movie Box Office Collection : रणवीर सिंहची बहुप्रतिक्षित स्पाय-थ्रिलर फिल्म ‘धुरंधर’ सध्या बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. प्रदर्शनानंतर अवघ्या काही दिवसांतच या चित्रपटाने प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवत तगडी कमाई केली असून, आता हा सिनेमा 400 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे गल्फ देशांमध्ये बंदी असतानाही ‘धुरंधर’च्या कमाईत फारशी घट झालेली नाही, हे या चित्रपटाच्या लोकप्रियतेचं मोठं उदाहरण मानलं जात आहे.

कोणत्या दिवशी किती कमाई?

चित्रपटाने पहिल्याच दिवशी 28 कोटी रुपयांची दमदार ओपनिंग घेतली होती. पहिल्या शनिवारी ही कमाई वाढून 32 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली, तर पहिल्या रविवारी सुट्टीचा फायदा घेत ‘धुरंधर’ने 43 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. आठवड्याच्या सुरुवातीला, म्हणजे सोमवारी, कमाईत थोडी घसरण झाली आणि चित्रपटाने सुमारे 23.25 कोटी रुपयांची कमाई केली. मात्र त्यानंतर मंगळवारपासून पुन्हा एकदा चित्रपटाने स्थिर आणि मजबूत कलेक्शन राखले. Dhurandhar Movie Box Office Collection

पहिल्या आठवड्यात मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी प्रत्येकी सुमारे 27 कोटी रुपयांची कमाई झाली. या सात दिवसांत ‘धुरंधर’ने एकूण 207.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. एवढ्या कमी कालावधीत 200 कोटींचा टप्पा पार करणं हे कोणत्याही चित्रपटासाठी मोठं यश मानलं जातं, आणि ‘धुरंधर’ने ते सहज साध्य केलं.

दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाची घोडदौड आणखी वेगवान झाली. दुसऱ्या शुक्रवारी 32.5 कोटी रुपयांची कमाई करत चित्रपटाने चांगली सुरुवात केली. शनिवारी प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आणि त्या दिवशी तब्बल 53 कोटी रुपयांचा गल्ला जमवण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या रविवारीही चित्रपटाने जोरदार कामगिरी करत अंदाजे 58 ते 59 कोटी रुपयांची कमाई केली.

लवकरच गाठणार 400 कोटींचा टप्पा

Sacnilk ने दिलेल्या अंदाजानुसार, ‘धुरंधर’ने दहाव्या दिवशी सुमारे 59 कोटी रुपयांचा व्यवसाय केला असून आतापर्यंतचा एकूण देशांतर्गत बॉक्स ऑफिस कलेक्शन सुमारे 351 ते 352 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सध्याचा ट्रेंड पाहता, येत्या काही दिवसांतच हा आकडा 400 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाचा एकूण बजेट सुमारे 250 कोटी रुपये आहे. त्यामुळे अवघ्या 10 दिवसांतच खर्च वसूल करत ‘धुरंधर’ने स्वतःला ब्लॉकबस्टर ठरवले आहे. रणवीर सिंहच्या करिअरमधील हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या यशांपैकी एक चित्रपट ठरत असून, त्याच्या अभिनयाचं आणि चित्रपटातील अ‍ॅक्शन-थ्रिलर कथानकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. आगामी काळात कोणतीही मोठी स्पर्धा नसल्याने ‘धुरंधर’ची कमाई आणखी वाढेल, असा अंदाज व्यापार विश्लेषक व्यक्त करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांतच रणवीर सिंहचा हा चित्रपट 400 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होऊन आणखी एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर करेल, यात शंका नाही.