काही तरी मोठं घडणार! दिल्लीत घडामोडींना वेग, अमित शाह, सरसंघचालक भागवत मोदींना भेटले

Arundhati Gadale

दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे पाऊल उचलण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक केली. या बैठकीत सैन्याला कारवाई करण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य मोदींनी दिले आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे प्रमुख अजित डोवल उपस्थित होते.

बैठक संपताच काही वेळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि संरसंघचालक यांच्या काही चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र, सरसंघचालकांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सरसंघचलाकांच्या भेटीपूर्वी गृहमंत्री अमित शाह हे देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्याची माहिती आहे. दिल्लीमध्ये भेटीगाठींचे हे सत्र पाहता काही तरी मोठे घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पंतप्रधानांचे स्पष्ट आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत आपल्या निवासस्थानी बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी सैन्य दलावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तसेच पहलगाम हल्लानंतर दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणे हा राष्ट्रीय संकल्प असल्याचे सांगितले. कुठे आणि कधी कारवाई करायची याचे पूर्ण स्वातंत्र्य पंतप्रधानांनी सैन्याला दिले आहे.

भारत-पाकिस्तान युद्ध होणार?

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. पाकिस्तानच्या पाठींब्यानेच आतंकवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्याचे भारताने पुराव्यासह सिद्ध केले आहे. फक्त आर्थिक निर्बंधच नाही तर पाकिस्तानला कायमचा धडा शिकवण्याची मागणी होत आहे. त्या दृष्टिने भारताकडून युद्धाची तयारी करण्यात येत असल्याचे संकेत मिळत आहे. पंतप्रधानांनी सैन्याला पूर्ण सूट देत युद्धाचे दिशाने महत्वाचे पाऊल टाकल्याचे मानले जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कोणत्या देशांचा पाठींबा मिळतोय याचा देखील आढाव घेण्यात येत आहे.

ताज्या बातम्या