पाकिस्तानचे काही खरे नाही, भारतीय सैन्याला पूर्ण सूट! मोदींनी बैठकीत दिला स्पष्ट संदेश

Arundhati Gadale

दिल्ली : पहलगाम आंतकवादी हल्ल्यानंतर रणनीती ठरवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखीला उच्चस्तरीय बैठक आज झाली. या बैठकीला तिन्ही दलाचे प्रमुख, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल हे उपस्थित होते. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने सुत्रांच्या हवाल्याने बैठकीत मोदींनी काय संदेश दिला हे सांगितले आहे.

एएनआय वृत्तानुसार, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणे हा राष्ट्रीय संकल्प असल्याचा म्हटले तसेच भारतीय सैन्य दलावर पूर्ण विश्वास व्यक्त करत कुठे आणि कधी कारवाई करायची याचे संपूर्ण अधिकार सैन्यदलाला दिले.

पंतप्रधान मोदींनी दहशवाद्यांच्या विरोधात ऑपरेशन आखण्याचे अधिकार भारतीय सैन्याला दिले आहेत. त्यामुळे कुठे आणि कधी कारवाई करायची हे भारतीय सैन्यदल निश्चित करणार आहे. पंतप्रधान मोदींनी सैन्याला खुली सुटी दिल्याने पाकिस्तानाला धडकी भरली आहे. पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय सैन्य दहशतवादी अड्डे नष्ट करू शकते. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलाकडून अशीच कारवाई करण्यात आली होती.

पाकिस्तानची आर्थिक कोंडी

भारताने पाकिस्तानसोबच्या व्यापाराला पूर्ण स्थगिती दिली आहे. तसेच तिसऱ्या देशाच्या माध्यमातून पाकिस्तानसोबत होणारा व्यापार देखील पूर्ण थांबवला आहे. त्यामुळे पाकिस्तानची पूर्ण आर्थिक कोंडी झाली आहे. पाकिस्तानला आत्तापर्यंत 70 हजार कोटींचा फटका बसल्याचे मिडियारिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच सिंधू जल करारला स्थगिती दिल्याने त्याचे थेट फटका 24 कोटी नागरिकांना बसणार आहे. तसेच त्यांच्या उद्योग व्यवसायावर देखील परिणाम होणार आहे.

जम्मू कश्मीरमधील पर्यटनस्थळांनर बंदी

पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील तब्बल 48 पर्यटनस्थळावर बंदी घालण्यात आली आहे. राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, भारतीय सैन्य सीमावर्ती भागात अलर्ट मोडवर आहे. अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आला.

ताज्या बातम्या