राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना तातडीने रुग्णालयात (Chhagan Bhujbal Admitted In Hospital) दाखल करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागलं आहे, त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे.
अँजिओग्राफी करणार Chhagan Bhujbal Admitted In Hospital
अचानकपणे छगन भुजबळ यांच्या छातीत दुखू लागल्याने डॉक्टरांनी त्यांना तात्काळ ऍडमिट केलं. भुजबळ यांच्या चाचण्या सुद्धा करण्यात आल्या. या चाचणीतून मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी त्यांची अँजिओग्राफी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. कारण अँजिओग्राफी केल्यानंतरच छगन भुजबळ यांच्या छातीत दुखण्याचे नेमके कारण काय हे समजू शकणार आहे.

भुजबळ सतत चर्चेत
दरम्यान छगन भुजबळ हे नेहमीच माध्यमांमध्ये चर्चेत असतात मराठा आरक्षणाचा विषय असो वा मनोज जरांगे पाटलांना थेट शिंगावर घेण्याचा प्रश्न असो, छगन भुजबळ नेहमीच आक्रमकपणे ओबीसींची भूमिका मांडताना पाहायला मिळतात. राज्य सरकारने नुकत्याच काढलेल्या मराठा आरक्षणाच्या जीआरला सुद्धा छगन भुजबळ यांनी विरोध केला होता.या जीआरमुळे राज्यभरातील ओबीसींचे नुकसान होणार आहे, असा दावा त्यांनी केलाय. विशेष म्हणजे त्यांनी नुकतेच राज्यभरातील ओबीसींना एकत्र येण्याचे आवाहन करून आरक्षण वाचवण्यासाठी बीडमध्ये महाएल्गार सभेचे आयोजन केले होते. या सभेला राज्यातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित होते. या सभेत सुद्धा भुजबळांनी आपला आक्रमक पवित्रा दाखवला होता.











