भारतीय बाजारात टाटा मोटर्सच्या चारचाकी गाड्यांवरील लोकांचा विश्वास गेल्या काही वर्षांत लक्षणीयपणे वाढला आहे. मजबूत बांधणी, ५-स्टार सेफ्टी रेटिंग, परवडणाऱ्या किंमतीत आधुनिक तंत्रज्ञान आणि भारतीय रस्तांसाठी योग्य असलेली टिकाऊ कामगिरी हे टाटाच्या गाड्यांचे मुख्य आकर्षण बनले आहे. अशा परिस्थितीत अवघ्या काही दिवसांपूर्वी टाटा सिएरा लाँच झाली. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. ही या वर्षातील सर्वात अपेक्षित एसयूव्ही लाँचपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक या कारच्या लॉन्च होण्याची वाट पाहत होते.
Tata Sierraच्या मायलेज-स्पीडने मोडले रेकॉर्ड
टाटा सियाराने एसयूव्ही सेगमेंटमध्ये धुमाकूळ घातला आहे. लूक्स आणि फीचर्सने सर्वांनाच प्रभावीत केल्यानंतर आता सियाराने मायलेज आणि वेगाची झलक दाखवून सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्सची नवीन आणि हाय-टेक SUV टाटा सिएराने लाँच होताच मोठा पराक्रम केला आहे. टाटा सिएराने जास्तीत जास्त मायलेजचा एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. फक्त 12 तासांच्या सलगच्या ड्राईव्हमध्ये सिएराने 29.9 किमी प्रति लिटरचे आश्चर्यकारक मायलेज देऊन सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत.

टाटा सियाराची मायलेज टेस्ट ही इंदूरच्या NATRAX येथे घेण्यात आली. 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पिक्सेल मोशन टीमने ती पूर्ण केली. फक्त छोटे छोटे ब्रेक घेऊन ड्रायव्हर्स बदलण्यात आले. सलग 12 तासांच्या ड्राईव्हनंतर 29.9 किमी प्रति लिटर या आश्चर्यकारक मायलेजची नोंद करण्यात आली आणि त्याच दिवशी रेकॉर्ड देखील सर्टिफाइडल देखील करण्यात आले. टाटा मोटर्सने त्यांच्या नवीन टाटा सिएरा टर्बो पेट्रोलसह आणखी एक विक्रम रचला आहे. यामुळे ही एसयूव्ही पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स येथे हाय-स्पीड चाचणी दरम्यान सिएराने 222 किमी/तास वेग गाठला. हा वेग इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे. ही आतापर्यंतची सर्वात वेगवान एसयूव्ही आहे.
सर्वत्र टाटा सिएराची जोरदार चर्चा
टाटा सिएरा अखेर भारतीय बाजारात लॉन्च झाली आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होत आहे. ही या वर्षातील सर्वात अपेक्षित एसयूव्ही लाँचपैकी एक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक या कारच्या लॉन्च होण्याची वाट पाहत होते. अखेर ती प्रतिक्षा संपली आहे. ग्राहकांमध्ये क्रेझ निर्माण केलेल्या टाटा सिएरा एसयूव्हीची एक्स-शोरूम किमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होणार आहे. मध्यम आकाराच्या एसयूव्ही स्पेसमध्ये ह्युंदाई क्रेटा आणि मारुती सुझुकी व्हिक्टोरिसला टक्कर देणारी सिएरा हे रेट्रो-मॉडर्न डिझाइन, सेगमेंट-फर्स्ट ट्रिपल स्क्रीन सेटअपसह फीचर्ड केबिन आणि अनेक पॉवरट्रेन पर्यायासह लॉन्च करण्यात आली आहे.











