Soyabean Price Update: आज सोयाबीनच्या बाजारभावात मोठे चढ-उतार; पिवळ्या सोयाबीनच्या दरात तेजी कायम!

राज्यातील सोयाबीन बाजारपेठेत गुरुवारी मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. बाजार समित्यांमध्ये पिवळ्या सोयाबीनच्या दरातील तेजी मात्र कायम आहे. राज्यभरातील दरांचा आढावा घेऊ...

सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. दर वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये पिवळ्या सोयाबीन उत्पादकांना अधिकचा दिलासा मिळत आहे. ज्यातील सोयाबीन बाजारपेठेत गुरुवारी मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. नाफेड खरेदीची अपेक्षा, खुले बाजारातील व्यापाराचा वेग, स्थानिक मागणी आणि आवक यात झालेल्या बदलांमुळे विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 3,000 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान राहिले. राज्यातील काही ठिकाणी दरात तेजी दिसून आली. तर काही बाजारांमध्ये घसरण नोंदली गेली.

सोयाबीनला कुठे अन् किती भाव ?

10 व 11 डिसेंबरच्या आवक आणि दरातील अंदाज पाहता मराठवाडा व विदर्भातील बहुतेक बाजारपेठांमध्ये दरात 4,200 ते 4,500 रुपयांचा स्थिर कल असून, काही ठिकाणी सर्वोच्च भाव 5,400 ते 5,800 रुपयांपर्यंत पोहोचल्याची नोंद आहे. सर्वात जास्त दर वाशीम या बाजार समितीत नोंदवला गेला. येथे पिवळ्या सोयाबीनचा दर प्रति क्विंटल 5,800 रुपयांच्या वर पोहोचला असून सरासरी दर 5,500 रुपये राहिला. जालना बाजार समितीतही दरवाढीचा कल कायम असून येथे कमाल दर 5,400 रुपये नोंदवला गेला.

त्याउलट काही भागांत दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. कोरेगाव येथे सोयाबीनचा दर 5,328 रुपये कायम होता; पण पाचोरा, दर्यापूर, आर्वी, वरुड,  मलकापूरसह अनेक ठिकाणी किमान दर 3,000 ते 3,500 रुपयांच्या खाली घसरला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून आले. लातूर बाजार समितीत 14,504 क्विंटलची मोठी आवक झाली. येथे कमाल दर 4,525 असून सरासरी दर 4,400 रुपये नोंदवला गेला. अमरावती, नागपूर, हिंगोली, चंद्रपूर आणि माजलगाव या भागांतही आवक मोठ्या प्रमाणात असून, दर 4,000 ते 4,300 रुपयांच्या दरम्यान स्थिर आहे. नांदेड बाजारात 725 क्विंटल आवक झाली आणि येथे दर 3,875 ते 4,400 रुपये नोंदवला गेला.

विदर्भात सोयाबीन दरात सुधारणा

विदर्भातील सिंदीआर्णीउमरखेडघाटंजी या बाजारांतही दर चांगल्या पातळीवर राहिलेसिंदी येथे कमाल दर 4,565 रुपये, तर आर्णी येथे 4,600 रुपये नोंदवले गेले. बुलढाणा, चिखली, वणी तसेच बाभुळगाव या बाजारांतही दरात मध्यम तेजी दिसून आली. उत्तर महाराष्ट्रातील येवला, लासलगाव, निफाड, पिंपळगाव(ब) येथे दर 4,300 ते 4,500 रुपयांच्या आसपास राहिले. पिंपळगाव(ब)-पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनचा सर्वाधिक दर 4,611 रुपये नोंदवला गेला. बारामती व मालेगाव (वाशिम) भागातही 4,400 ते 4,435 सरासरी दर कायम राहिला. त्यामुळे सोयाबीन दराच्या बाबातीत शेतकऱ्यांना आगामी काही दिवसांत आणखी दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News